‘क्षण’ दिसायला दोन अक्षरे
चुकीच्या निर्णयाने क्षणात
जीवन मातीमोल करे !
चांगल्या बेरजा क्षणाच्या
वजाबाक्या वाईटाच्या,
कधी गुणाकार
कधी भागाकार !
क्षणाच्या विलंबाने चुकते प्लेन,
चुकते ट्रेन,
निसटते संधी,
आयुष्यात येते आंधी !
मनाच्या चलबिचलतेने
क्षणार्धात सुटतो तोल,
होत्याचे नव्हते करण्या
उद्युक्त करतो क्षण !
त्याच क्षणाला सावरायला हवे
क्षणाक्षणाला मन भानावर हवे,
जगण्याच्या चांगल्या उमेदीने
जीवनाकडे बघायला हवे !
जीवनात चांगला क्षण येतो
आपण नकळत दूर सरतो !
क्षणार्धात हातची संधी जाते
पुढच्या क्षणाची हुरहूर लागते !
जगदीश पटवर्धन
Leave a Reply