तुमचे वागणे , बोलणे
कुणाला समजत नाही
असे कधी समजू नका
फक्त कुणी बोलत नाही
वादविवाद नको म्हणूनी
संघर्ष कुणी करत नाही
मौनं सर्वार्थ साधनम.
या शिवाय शांती नाही
मनामनाला जपत रहावे
याविण , दूजे सुख नाही
अध्यात्म ही आत्ममुखता
मीत्व कधी मिरवणे नाही
केवळ स्वतःचा शोध घेणे
याविण जीवना अर्थ नाही
परस्पर प्रेमळभाव जपावा
याविण दूजे सत्कर्म नाही
श्वास ! हा बुडबुडा क्षणाचा
इथे उद्याचा भरवसां नाही
उगा हवेत कशाला हेवे दावे
मृत्युसंगे , काही येणार नाही
— वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १२१.
२१ – ४ – २०२२.
Leave a Reply