माणूस हा सामाजिक प्राणी आहे. आपली जडण घडण देखील या समाजात झाली आहे… आपण सर्व या समाजाचे भाग आहोत आणि या समाजात राहणाऱ्या लोकांची आपण जरा जास्तच पर्वा करतो. आम्हाला नेहमी अशी भीती असते ही लोकं काय म्हणतील पण आपण विसरलो की आपल्या त्रास आणि संघर्ष या मध्ये हे लोकं कधीच आपल्या सोबत नसतात.
हे काय घातले आहेस तू? लोकं काय म्हणतील? राधा ताई रागाने आपल्या सुनेला म्हणाल्या… दहावीला इतकी कमी टक्केवारी सोनू… लोकं काय म्हणतील? एका अधिकाऱ्याचा मुलगा अभ्यासात मात्र ढ आहे. सीमा तुझ्या सर्व मैत्रिणीचे लग्न झाले आहे. तु कधी करणार? शेजारच्या काकूंनी डोळे मिचकावत विचारले?
अहो सविताताई तुमच्या सुनेच्या लग्नाला पाच वर्षं झाली आहे, ती गोड बातमी कधी देणार आहे ?
आम्ही आमच्या शेजारी, नातेवाईक आणि आमच्या सहकार्यांकडून दररोज असेच शेरे ऐकत असतो… हे असे लोक आहेत जे स्वतः पेक्षा इतरांच्या जीवनात काय घडत आहे या विषयी किंवा लोक आपल्याबद्दल काय विचार करत असतील याची काळजी करीत बसलेले असतात. अशा गोष्टी नकळत आपल्या भीतीचा भाग बनतात. आपण सर्व काही आपल्या आत्मसन्मानाशी आपल्या कुटुंबाशी आणि परिस्थितीशी जोडतो. आणि योग्य निर्णय घेण्याची हिंमत गमावून बसतो. आणि औदासिन्य किंवा नैराश्याच्या खोल गर्तेत सापडतो. या समाजाच्या अपशब्दांच्या भीतीमुळे बऱ्याचदा आपण चुकलेल्या काही निर्णयांचे ओझे आयुष्यभर आपल्या खांद्यावर वागवीत राहतो. आपल्यावर लोकांच्या बोलण्याचा दबाव असतो ती आपण स्वतःहून लोकांच्या म्हणण्यानुसार निर्णय घेऊ लागतो. अशा घटनांमुळे सर्वसामान्यांच्या मनात दबाव आणि भीती वाढत जाते त्यामुळे आपल्याला असेही वाटते की लहान मोठ्या निर्णयांमध्ये समाजाच्या विचारसरणीचा विचार करणे आवश्यक आहे, ही आपली मानसिकता बदलली पाहिजे. आपल्या आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आता आम्ही लोकांची चुकीचे बोलणे सहन करणार नाही आम्ही त्यांना समर्पक उत्तर देण्यास कचरणार नाही. समाजातील हे “लोक” आपल्या समस्यांमध्ये कधीही आम्हाला पाठिंबा देणार नाही. आपण योग्य किंवा चुकीचे केले तरीही हे “लोकं” प्रत्येक गोष्टींवर भाष्य करतील, म्हणून जे काही आपल्याला योग्य वाटत असेल तेच करावं. कारण फक्त आपण आपल्या निर्णयासाठी जबाबदार असणार आहोत. लोक काय म्हणतील याचा विचार करुन आम्ही स्वतः किंवा आपल्या मुलांचा आनंद, त्यांची स्वप्ने अर्ध्यात सोडून शकत नाही. अन्यथा ही भीती आमच्या मुलांच्या हृदयात घर करून राहील आणि हा ट्रेंड असाच पुढे सुरू राहील.
आम्ही काय करावे, कसे करावे, ते सर्वश्री आपल्यालाच ठरवायचे आहे. होय इतरांची मदत नक्कीच घेतली जाऊ शकते. पण तेथे काही गोंधळ असेल तर… पण शेवटी आपल्याला मार्ग शोधावा लागेल. कारण कसेही वागलो तरी “शेवटी कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना” हेच खरे.
दि. २६/०५/२०२१ @ शरद कुसारे
Leave a Reply