नवीन लेखन...

कुजबुज

लॉकडाऊन मुळे नोकरी गेली होती. मुलं शिक्षणाच्या वयातील. साठवलेले किती दिवस पुरणार. त्यामुळे त्या दोघांनी ठरवले की आपल्या ओळखीच्या लोकांना घरगुती डबे पाठवू या. एक दोन करता करता बरेच जण तयार झाले. आता पैसाही बऱ्यापैकी मिळू लागला हे पाहून त्यांनी घरासमोरची मोकळी जागा भाड्याने घेऊन मेस सुरू केली. हे कौतुकास्पद होते पण कुजबुज. नोकरी दुसरी शोधायची. हे बर दिसतं का? इति नातेवाईक.
मावशीबाईचा नवरा गेला. घरात चार तोंड भरायची. दु:ख करत बसून कसे चालेल. म्हणून कामाला आल्या. कुजबुज. काय बाई आजकाल कोणाला कशाचेही काही वाटत नाही. नवरा आजारी होता तेव्हाही ही बाई अशीच हिंडायची फिरायची. दिवस असे कलियुग आहे ना. घरी बसून नवऱ्याची सेवा करायची तर औषध दवाखाना हे सगळे काय फुकटात नसते हे माहित असूनही…
मुलीचा घटस्फोट झाला. कारण काय हे ज्याचे त्यालाच ठाऊक. पण कुजबुज. आजकालच्या मुली. काम नको. सासुसासरे नको. चैन करायला पाहिजे. अशाने संसार होत नसतो. खूप झिजावे लागते. त्या पोरीला एक अक्कल नाही पण आईवडिलांनी तरी तिला चार गोष्टी समजावून सांगितले पाहिजे होते. आता नवऱ्याने टाकून दिलेली. हिचे पुढे कसे होणार हो. नोकरी म्हणजे सर्वस्व नसते. हे सगळे आईबापाला समजते. काही तरी तसेच कारण असेल म्हणूनच ते मुलीच्या पाठीशी उभे असतात…
एखाद्या मुलाला पार्टीत पोलीसांनी पकडलेले असते. तेंव्हाही दोषी आईबाबाच. मुलगी पळून गेली. सासुसासरे वेगळे राहतात. मूल होऊ शकत नाही. लाच प्रकरणात नवऱ्याला अटक झाली. बायको दोषी. असे कितीतरी प्रकार आहेत आणि दरवेळी सहानुभूती. मदत. मानसिक धैर्य देणे..हे महत्वाचे असते. ते सोडून फक्त कुजबुज….
मला सगळ्यात जास्त वाईट वाटते ते म्हणजे एखाद्या बाईवर बलात्कार झाला असेल तर तो विषय जाहीरपणे चर्चिला जातो. आरोप प्रत्यारोप करताना आपण काय बोलतो. याचेही भान नसते. पिडीत कोणत्या परिस्थितीत आहे. तिच्या मनात काय विचार चालले आहेत. ती प्रत्येक क्षण कशी झिजत आहे याची कल्पना नसते. एखाद्या चोर घर लुटून नेतो. एखादा वैयक्तिक स्वार्थासाठी खून करतो. एखादा वासनाविकृती मुळे जबरदस्तीने वैयक्तिक वासना भागवतो. या सगळ्यात जबरदस्तीच असते. पण पैसा परत मिळवता येईल. गेलेला माणूस याचे दु:खही हळूहळू विसरले जाते. मात्र स्त्रीच्या अस्तित्वाची अस्मिता परत कधीच येत नाही. लोकांच्या नजरा आणि कुजबुज याचा विचार करत राहिले तर जगणे मुश्किल होईल. हा आघात कायम स्वरूपी काळजाला जखमी करणारा आहे…
प्रत्येकांच्या घरात काही ना काहीतरी चांगले वाईट अनुभव असतात. म्हणून कुजबुज करणे कितपत योग्य आहे. आणि कोणतीही कुजबुज करण्याआधी सारासार विचार करून बोलावे. उचलली जीभ लावली टाळ्याला. आणि फुकटात आहे म्हणून का?
— सौ कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..