|| हरि ॐ ||
बाबांच्या खांद्यावर संसाराचे ओझे, संसाराचे ओझे,
बाबांच्या मानेवर कर्जाचे बोजे, कर्जाचे बोजे !
पत्नी आणि मुलांची सकाळपासून
फर्माइश !
म्हणती घ्या नवीन मोटार आणि फ्लॅट,
आणा टीव्ही आणि अनेक वस्तू त्यात,
कारण आता मिळते कर्ज बँकेतून !
बायको म्हणते तुम्हांला नाही कशी ती हौस,
म्हातारपणी म्हणते करा माझी मौज,
मुले तरी बघा कशी आईच्या वळणावर,
म्हणती, आम्हांला तुमच्या वाचून तरी कोण?
बायको म्हणते नोकरीची राहिली किती वर्षे?
करा घाई आता काढून कर्ज चुटकी सर्से !
साहेब म्हणतो नोकरीची राहिली किती वर्ष?
फेडतील कर्ज कोण? बायको आणि मुले सर्व?
बाबांनी कर्जासाठी आणला फोर्म बँकेतून,
मित्रसखा सांगतो, पडूनको यात !
कर्जासाठी बँकांचे जाचक नियम,
सावकाराकडे जाती सगळे लपून छपून,
व्याज सावकाराचे झळके “व्यवहारशून” !
मतलबी सावकारांचा असा हा डाव,
तरी कसे समजवावे मुला मंडळींना?
स्वत:च्या ज्ञानाने लावतात जीवघेणी स्पर्धा,
हजारोंनी कर्ज करिती नंबर पहिला स्पर्धा,
मुला-मंडळींना तमा येथे, लाज ना लज्जा,
घेणाऱ्याचे हात न धरती, करु आपण मज्जा !
बाबांच्या खांद्यावर संसाराचे ओझे संसाराचे ओझे !
बाबांच्या मानेवर कर्जाचे बोजे, कर्जाचे बोजे !!
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply