कोकणातील कुणकेश्वर या अत्यंत सुंदर मंदिर परिसरात फिरण्याचा नुकताच योग्य आला. स्वच्छ समुद्र व हिरवागार निसर्ग यांच्या कोंदणामध्ये आपल्या भव्य मंदिरात वसलेला देव श्री कुणकेश्वर !
येथून अगदी जवळच महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे खूप छान पर्यटक निवास आहे. कुणकेश्वर मंदिराच्या मागील किनाऱ्यावर एक वैशिष्ठ्य पाहायला मिळाले. देवळाच्या तटबंदीपर्यंत समुद्राच्या लाटा येऊन नंतर ओहोटी लागते. तेव्हा तेथील वाळूमध्ये अशी काही लघुशिल्पे, नैसर्गिकरीत्याच तयार होतात ती पाहताना खूप जुन्या, गाडलेल्या एखाद्या जुन्या संस्कृतीच्या त्या पाऊलखुणाच वाटाव्यात. नंतरच्या भरतीमध्ये पुन्हा हे नैसर्गिक शिल्पकाम वाहून जाते आणि पुढच्या ओहोटीला पुन्हा नव्याने तयार होते ! येथील समुद्रावर पोहणाऱ्यांसाठी जी कळकळीची सूचना लावली आहे ती मात्र प्रत्येकानेच लक्षात ठेवण्यासारखी आहे.
–मकरंद करंदीकर.
Leave a Reply