तुझ्या आठवातुनी रमता, रमता
प्रीतभावनां! झुळझुळती अविरत।।
मन! हे वेडे,बावरे तुलाच शोधिते
शब्दांतूनी, तूं झुळझुळते नितनीत।।
तूंच शब्दगंधाळ, नाद, सूर, ताल
भावकाव्य! येई हृदयातुनी उमलत।।
तुझ्या स्मृती, मधुरम मधुरम मोहक
निरांजनी! उजळते जशी फुलवात।।
अंतरात नाही आज कुठलीही खंत
मज सावरते गं तुझी प्रीत सदोदित।।
तूं तर स्मरणगंधली, कुपी अत्तराची
सखये! दरवळतो गं सारा आसमंत।।
©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १०६.
११ – ८ – २०२१.
Leave a Reply