रमा सकाळची कामे भरभरा उरकून. मशीन वर शिवायला बसली होती. लग्न सराई. संक्रात आणि इतर अनेक कारणाने शिलाईचे काम भरपूर आहे म्हणून ती लवकरच आवरुन मशीन वर शिवायला बसली होती पण आज मशीनचा मूड वेगळाच. खट खट असा आवाज आला आणि मशीन चालू होत नाही. त्यामुळे तिने बारीक नजरेने पाहिले तेव्हा लक्षात आलं की तिला बरेच दिवस झाले असतील तेल टाकून म्हणून तिने असहकार पुकारला. पण आता बाहेर जाऊन आणणे नतंर शिवणकाम यात बराच वेळ जाणार. तेल टाकणे अत्यंत आवश्यक होते. मशीनची गरज. वेळ आणि काम याच गणित कस जमवायला हवे. तिने पटकन खोबरेल तेल टाकले दोन थेंब. मशीन पुसून चालू केली. अहो आश्चर्यम तिची कुरकुर बंद झाली. आणि पटकन ते शिवणकाम पूर्ण केले. आणि ती थोड्या अंतरावर असलेल्या घरी नेऊन दिले. पैसे घेऊन येताना कोपऱ्यावरच्या ओळखीचे शिंपी त्यांच्या कडून मशिनचे तेल मागितले आणि तेही परत देण्याच्या बोलीवर. ताई एक सांगू का खडखडाट झाल्यावर धावपळ करण्या पेक्षा आधीच काळजी घेतली तर असे होत नाही. एवढेच…
किती मोलाची गोष्ट सांगितली त्यांनी. पूर्वी दारं खिडक्या यांना दरवर्षी दसरा दिवाळीच्या दरम्यान एका वाटीत तेल दिले जायचे. मग आम्ही चिंधीने बिजागर. कडी कोंडा यात तेल सोडून मग ते संबंध दाराच्या दारावरुन फिरवत असू. आणि त्यांची कुरकुर बंद व्हायची. आणि दार खिडक्यांच्या पटावर एक चमक यायची. बैलगाडी. यंत्र अशा अनेक गोष्टी असतात जिथे या तेलाची अत्यंत आवश्यकता असते.माणसाच्या देहाला यंत्रालाच नाही मनालाही असे तेल देणे आवश्यक आहे विज्ञान फक्त विद्यापीठाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन कळत नाही पण अशा वेळी अनुभवाने माणूस खऱ्या अर्थाने उत्तीर्ण होतो. दर आठवड्याला थोडे खोबरेल तेल कोमट करुन लहानपणी आई आधी जमिनीवर पाच बोटे ठिबके लावून मग एकेका कानात थेंब थेंब घालायची.
आणि मग डोक्यावर धार लावून मजास करायची. उन्हाळ्यात पायाला थोडे तेल लावून आणि असेल तर काशाच्या वाटीने तळपाय मसाज. त्यामुळे डोळे डोक शांत व्हायचे. महिन्यातून एकदा एरंडेल नाक दाबून चहात घालून पाजले जायचे. पण पोट एकदम साफ आणि पुढील काही दिवस अचरबचर खायला मोकळे.. अभ्यंग स्नान दर आठवड्याला. हातपाय चोळून मोळून. शिकेकाईने डोके स्वच्छ कोवळ्या उन्हात केस वाळेतोवर काही तरी खायला असायचे. पण हे सगळे यंत्र किंवा बाह्य शरिरालाच नाही तर मरगळलेल्या. गंजलेल्या मनाला सुध्दा गरज आहे. त्यामुळे खडखडाट खात्रीलायक बंद होईल. पण त्या साठी प्रेम माया आपुलकी. माणुसकी. विश्वास आधार भक्ती भाव. मनापासूनचा स्पर्श. माघार घेणे. मदत करणे नम्रपणे बोलणे हे तेल जिथे लावाल तिथे रुक्षपणा गंजलेले. घालवून परत नात्यातील स्निग्ध पणा आणणार हे निश्चित. या सगळ्यांचे मिश्रण असलेले तेल म्हणजेच भावना जर एकमेकांना समजून सांभाळून घेऊन संवाद साधला तर आता झालेले दूषित वातावरण नक्कीच चांगले होईल. हो यात इगोची भेसळ असता कामा नये. बघा पटतंय का?
-सौ कुमुद ढवळेकर
Leave a Reply