सुरासम्पुर्णकलशंरुधिराप्लुतमेवच।
दधानाहस्तपद्माभ्यांकुष्मांडाशुभदास्तुमे।।
पूर्वी अवकाशात अंधार होता. काहीच दिसत नव्हते. अशावेळी मंद, हलकं स्मितहास्य करित मातादेवीने ब्रह्मांडाची निर्मीती केली. म्हणून सृष्टीचे आदीस्वरुप दुर्गामातेला मानले जाते. कुष्मांडा या नावाने तिची पुजा करतात. दाहीदिशांवर मातेचा प्रभाव आहे. सूर्याप्रमाणे तिचे तेज असल्याने ब्रह्मांडातील सर्वजीवमात्रांबर, प्रत्येक वस्तुंवर कुष्मांडामातेचे तेज पडते. तिच्या पुजनाने रोगमुक्ती होते. यश,बळ,शोकमुक्तता,आरोग्य प्राप्त होते. या मातेच्या रुपात मातृत्व ओसंडून वाहते. म्हणूनच अत्यल्प साधनेतूनही कुष्मांडा माता प्रसन्न होते.
आष्टभुजा धारण केलेल्या मातेने सातपैकी एका हातामध्ये कमंडलु,मगधनुष्य,बाण,अमृतपूर्णकलश,चक्र,गदा आणि आठव्या हातात जपमाळ आहे. शुक्रवारी चौथी माळ आली. अबोली,तेरडा,अशोक,तिळाची फुले या पासून बनविलेली माळही घटाला अर्पण केली जाते. वास्तविक शुक्राचा रंग तसा पांढरा आहे.पण हा रंग आपण सोमवारी ऊपयोगात आणतो. शुक्र हा प्रेमाचा आणि भोग-विलासाचा कारक असून शुक्राचा प्रभाव आपल्या जीवनसाथीवर असतो. प्रेमाचा रंग आणि शुक्राचा रंग अनुक्रमे लाल अधिक पांढरा यांपासून गुलाबी रंग बनतो. ह्यादिवशी हा रंग कपड्यांच्या माध्यमातून वापरल्यास शुक्राची कृपा होऊन माणसाचे जीवन ऐश-आरामात व्यतीत होते. संपत्तीची वृध्दी होते. गुप्तरोगादीसमस्या दूर होण्यास मदत होते.
यादिवशी ५ वर्षाच्या कन्येच्या रुपात माता असते. तिला रोहिणी असे नामा भिदान आहे. अशा कन्येची देवी स्वरुप मानून पूजा केल्या सराज्य पदप्राप्ती होते. यादिवशी तिला लोण्याचा नैवेद्य दाखविला जातो.
-शुभंभवतु
— प्रा.गजाननशेपाळ
Leave a Reply