नवीन लेखन...

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – १०

बिपीनची मृणाल सेनशी फोन फोनी चालू होती. भूतान मधील hydro electric generation plant chukha ( name of the towmship ) उभारण्याचे काम जोरात चालू होते. त्यांचे ऑफीस थिंपू या राजधानीत होते. तो कामानिमित्त कलकत्याला जात असे तेंव्हा या कामाचे स्वरूप त्याला माहीत होते, त्यांना अनुभवी इंजिनीयर लोकांची गरज होती. पण आता मृणालला आपली खरी वस्तुस्थिती सांगावीच लागणार होती. त्यांची दोघांची जान पहचान चांगलीच झाली होती. बिपीनने आपले सर्व पत्ते आता तिच्या समोर उघडले होते, पण याबाबत कुठेही वाच्यता करू नकोस, याचा मोबदला तुला पुढील जीवनात नक्की मिळेल असे आश्वासनही दिले होते. आपल्या जुगारातील हा महत्वाचा फासा त्याने फार काळजीपूर्वक टाकला होता, यावरच पुढच्या जीवनाचा मार्ग सुकर होणार होता.

हॉटेल समोरच भूतान देशात शिरण्याचे लाल चुटूक, बौद्ध पद्धतीचे नक्षीकाम असलेले भव्य प्रवेशद्वार त्याला आव्हान देत होते. work permit हातात पडल्या शिवाय तो काहीच करू शकत नव्हता. मृणालच्या फोनची चातकासारखी वाट पाहाता ८ दिवस झाले होते, एका बाजूनी मौशुशी गोड गोड बोलायचे आणि दुसऱ्या बाजूने मन तर खचत चालले होते, शेवटी एका सकाळी मन खंबीर करत त्याने मृणालला फोन लावला, मात्र “बिपीन तुमचे काम जवळ जवळ फत्ते झाले असून दोन दिवसात तुमच्या हॉटेलवर सर्व कागद पत्रे तुम्हाला मिळतील याची व्यवस्था केलेली आहे. आत्ता ३ महिने राहण्याची परवानगी आहे पुढे कंपनी सर्व व्यवस्था बघेल, माझाकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, मी आशेत आहे की आपले लवकरच भेट होईल, ” मृणालच्या गोड आवाजातील या बातमीने त्याला स्वर्ग दोन बोटेच उरला होती, या आनंदात त्याने स्वर्गभूमी भूतान मध्ये प्रवेश केला. एकदा घडाळयाचे काटे उलटे फिरवले की काळही तसाच फिरू लागतो.

८ दिवसात त्याने भूतान देशावरील सिंग या इतिहासकराचे पुस्तक वाचल्याने या देशाचा सर्वांगाने परीचय करून घेतला. कुइंगा हॉटेल मालकाशी सविस्तर बोलणी करून एक उत्तम टॅक्सी व भूतान मध्ये वास्तव्य असणारा ड्रायव्हर तेनसिंग यांना प्रवासाकरता पक्के केले. तेनसिंग हा तरणाबाण भूतान च्या थिंपू राजधानीत राहिलेला, देशातील रस्त्यांची उत्तम जाण, इंग्रजी व हिंदी जाणणारा, बिपीन शिताफीने सर्व माहिती मिळवत होता.

मौशु आता रडण्या पलीकडील अवस्थेत गेल्याने ती उदासपणे गाडीच्या खिडकीतून बाजूचे डोंगर जंगल नद्या पाहत होती. एका अभागी मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. तेनसिंग आवेशात बोलत होता. ’आमच्या देशाच्या सीमा भारत व चीन या दोन बलाढ्य देशांना लागून असल्यामुळे आम्हाला दोन्ही देशांशी मैत्री करावी लागते, पण आम्हाला भारत ज्यास्त जवळचा वाटतो, सर्वच बाबतीत आम्ही त्यांच्यावर अवलंबून आहोत चीनने तिबेटची काय वाताहात केलेली आहे हे आम्हाला पूर्णपणे माहीत आहे. ४६ हजार स्क्वेअर किमी पसरलेला आमचा देश पण लोकसंख्या जेमतेम ३० लाख आहे. पर्यावरण समतोल राखण्यात जगात आमचा वरचा नंबर आहे, आमच्या देशात जगभरचे पर्यटक केंव्हाही येऊ शकतात, पण ३ महिन्या शिवाय कोणालाही राहता येत नाही, त्या बाबत येथील नियम फार कडक आहेत. बिपीन ऐकून चपापलाच, पण पुढील वाक्याने तो सुखावला,, पण आमच्या देशाच्या प्रगती करता जी कामे चालू आहेत त्यावरील भारतीय लोकांकरता नियम शिथील असून ती अनेक वर्षे राहू शकतात. आमच्या देशात जल संपत्ती भरपूर असून त्या पासून वीज उत्पन्न करण्याचे अनेक प्रकल्प उभारले आहेत, ज्या मध्ये अनेक भारतीय काम करत आहेत. चुखा, पारो थिंपू या ठिकाणी ते काम करतात. बिपीन तीक्ष्ण कानाने सर्व गोष्टी ऐकून घेत होता. गाडीत हिंदी गाण्याच्या भरपूर कॅसेट्स असल्याने संगीताची साथ, डोंगर दऱ्या, जंगलाने वेढलेला घाट माथ्याचा रस्ता, निर्मनुष्य रस्ते, वातावरणातील निस्तब्ध शांतता, मौशु कंटाळून गाढ झोपी गेली होती. बीपीन आसुरी आनंदात डुंबून गेला होता.

वाटेत वांगचू या नदीवरील चुखा जवळील भव्य हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प खोल दरीत पसरलेला दिसत होता. काही वर्षापूर्वी त्याच्या मुंबईच्या कंपनीने कलकत्ता ऑफीस मार्फत काही कामाचे आराखडे केलेले होते, त्यांचे ऑफीस थिंपू मध्ये होते. संध्याकाळी ६ च्या सुमारास १७० किमी प्रवास पूर्ण करत ७७०० फूट उंचीवरील राजधानीच्या शहरातील हॉटेल तेंडीन मध्ये दोघांचे आगमन झाले. हवेत प्रचंड गारवा निर्मनुष्य रस्ते, विजेचा प्रचंड झगझगाट जणु स्वप्न नगरीच वाटावी असे वातावरण, हॉटेल मध्ये हीटरची व्यवस्था, मौशु ताजीतवानी झाली, आईची आठवण काढल्यावर जराही न रागवता उद्व उडवीची उत्तरे देत तिचे लक्ष उत्तम प्रतीच्या टीव्ही वरील कार्टून सिनेमाकडे वळविले.

— डॉ. अविनाश वैद्य.

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..