बिकट परीस्थिती बेतली की लहान मुले ज्यास्त खंबीर बनतात. हा निसर्ग नियमच आहे. मौशुही त्याला अपवाद नव्हती जोगना तिची आई व मैत्रीण अशा दोन्ही भूमिका बजावत होती. बिपीन रात्री बेरात्री केंव्हाही घरी येत असे, पण घरी आल्यावर आपल्याच तोर्यात तडक आपल्या खोलीत निघून जात असे. मौशु आपल्याच घरात पोरकी झाली होती, ती काहीवेळा रुसत असे, हळूहळू ती एकलकोंडी बनत चालली होती. बाबा तर तिच्या जीव्बातून केंव्हाच नाहीसा झाला होता. जोगना मात्र तिच्या इतके कलाकलाने घेत असे, तोच एक आशेचा अंकुर मौशुच्या जीवनात होता. जोगानाला सर्व प्रीस्थीतीची पूर्ण कल्पना आलेली होती, पण सरते शेवटी ती बीपेंच्या घरातील एक नोकरांनी होती, तिच्या पोटा पाण्याचा प्रश्न होता, तरीही मौशूला गोंजारत, चुचकारत तिला जेवढे म्हणून आनंदात ठेवता येईल याचा जीवतोडून प्रयत्न करीत असे.
टोगशेंचे घर हा फार मोठा आधार मौशुला होता. तिच्या जीवनात आनंदाचे किरण त्या सर्वांच्या प्रेमामुळे डोकावत होते. ती घरात झाली की तिला मोठया खुबीने जोगाना त्यांच्या घरी घेऊन जात असे. एकदा ती रमली की तासन तास त्यांच्या घरी रमत असे. यामुळे तिने इंग्रजी व भूतानी भाषा छानपणे आत्मसात केली होती. डोंग्जे रिपो हा मित्र तर होताच, पण तो मोठया भावासारखी तिची काळजी घेत असे. त्यांच्या गाडीने ती अनेक वेळा बाजारात जात असे. सूरवंटा मधून उडणाऱ्या फुलपाखरासारखे तिचे जीवन फुलत होते, काळापेक्षा तिची धाव जास्त वेगाने पुढे जात होती. अर्थपूर्ण जीवन जगण्याचा मार्ग दिसू लागला होता
— डॉ. अविनाश वैद्य.
Leave a Reply