गेल्या ५/६ दिवसात मौशुनी भूतान देशातील विविधता पाहिली, रीन्पोंची बोलण्याची पद्धत, आत्मविश्वास, आदराची भावना या सर्व गोष्टींचा खोल परिणाम तिच्या मनावर झाला होता. तिला एक वेगळेच जग पाहण्यास मिळाले होते, पण मनाच्या दुसऱ्या कप्प्यातून तिचा भूतकाळ उलगडू लागला होता. सतत येणाऱ्या आईच्या आठवणीने कोवळ्या नाजूक मनाची लय साफच बिघडली होती. लहानपणी आईने सांगितलेल्या परीकथा तिच्या डोळ्यासमोर येत, त्यात ती काही वेळ गुंगून जात असे, पण एकदम तिला लक्षात येई की आई जवळ नाहीच आहे. ती उदासपणे आपल्याच विचारात इतकी गुंग होत असे की तोंगशे तिला काय सांगत आहेत याकडे तिचे लक्षच नसे. आई, आजीचे घर, मुंबई पासून या देश पर्यंत चा आपला प्रवास, घटनांची अर्धवट तुटलेली शृंखला मनावर घण पडत होते, आपल्या वडीलांनी स्वत:च्या सुखासाठी माझ्या आयुष्यावर वरवंटा फिरवला होता, माझ्या आयुष्याची राखरांगोळी झालेली आहे. पण हे सांगणार तरी कोणाजवळ?
या विचारांचा केंव्हातरी उद्वेग होणार होता. तिच्यातील झालेला आकस्मित बदल पाहून रीन्पोचेना तिची काळजी वाटू लागली होती.
एके दिवशी रीन्पोचेंचा मुलगा डोंग्जे मुंबई शहराची सीडी पाहण्यात दंग झाला होता, मौशुही ती पाहू लागली, आणि गेटवे ऑफ इंडिया, मलबार हिल, गिरगाव चौपाटी पाहता पाहता ती आनंदाने नाचू लागली, डोंग्जेला काहीच कळेना, पण घरी आल्यावर त्याने ही घटना वडलांच्या कानावर घातली. त्यानाही काही कळत नव्हते. दुसरे दिवशी मौशु एकटीच मुंबई टेलीफोनची सीडी विभागाप्रमाणे पाहू लागली. प्रथम बांद्रा पश्चिम विभागात बिपीन नायर या नावाचा नंबर मिळाला. मग दादर हिंदू कॉलनी शैलजा मराठे नावाशी जुळणारा नंबर असे दोन महत्वाचे नंबर लीहून घेतले या दोन न्न्ब्रानी तीच्या डोक्यात थैमान घातले होते. आपल्या मनात चाललेल्या या विचारांच्या झंझावाताला कोणता तरी मार्ग मिळणे गरजेचे होते. एके दिवशी आपले सर्वेसर्वा तोंगशे यांच्याशी अतिशय मोकळेपणाने आपल्या जीवनात घडलेल्या घटनांची क्रमाने माहिती देण्याचा प्रयत्न केला. प्रथम धीराने बोलणाऱ्या मौशूला आपले दु:ख आवरेनासे झाले, त्यानी तिला धीर देत सर्व घटना व्यवस्थित समजावून घेण्याचा मनापासून प्रयत्न केला, खर तर हे सर्व ऐकून त्यांचा विश्वासच बसत नव्हता. ते अर्धा तास सुन्न होऊन विचारात बुडून गेले होते. शेवटी मौशुनी हुंदके आवरत केविलवाण्या स्वरात त्यांना विनवणी करत म्हणाली “तुम्ही मला माझ्या आईशी व आजीशी संपर्क करण्यात मदत करा, मी याबाबत काही महत्वाची माहिती मिळविली आहे. पाच मिनिटे कोणीच बोलत नव्हते, पण त्या निस्सीम शांतते मधून आशेची किरणे दिसू लागली होती.
तोंग्शेंच्या डोक्यात या बिकट परीस्थिती मधून मार्ग कसा काढायचा याचे विचार चक्र वेगाने फिरू लागले होते. पावले अतिशय काळजी पूर्वक पण वेगात टाकावी लागणार होती. बिपीनला संपूर्ण पणे अंधारात ठेवण्याची नितांत गरज होती, खर तर तो आपल्या नव्या संसारात एवढा रमला होता, की त्याच्या नवीन आयुष्यात मौशूला काही स्थानच नव्हते. पण त्याचा विकृत स्वभावाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन योजना यशवी पार पडणे एक आव्हानच होते.
प्रथम मुंबईशी संपर्क साधून मौशुनी काढलेल्या टेलीफोन नंबरची खात्री करून घेण्यात यश मिळाले होते. त्यातील बिपीन नायरचा नंबर बाद झालेला होता. पण शैलजा मराठे नंबर चालू असल्याचे पडताळून पाहण्यात यश प्राप्त झाल्याने दोघेही खुश होते.
मौशु travel agency मध्ये काम करण्यास उत्सुक आहे हे बिपीनच्या हल्ली तिच्याकडे घरात येणारी कागदपत्रे, पुस्तके यावरून लक्षात आले होते. दिल्ली मध्ये ३ दिवसाचा कोर्स होता, त्याला तोंग्शेंच्या मदतीने तिला जाता येणार होते. एके दिवशी कधी नव्हे तर बिपीनने तिचा दिल्ली जाण्याचा विषय काढला व अगदी खुशीने परवानगी सुद्धा देऊन टाकली. त्याला आपल्या जीवनात जे जे मिळवायचे होते ते कधीच प्राप्त केले होते,
— डॉ. अविनाश वैद्य.
Leave a Reply