तोंगशे एकटेच ऑफीस मध्ये मौशूच्या जीवनात घडलेल्या प्रचंड उलथा पालथीच्या घटनांचा मेळ लावण्याचा प्रयत्न करत होते. तिच्या आयुष्याची झालेली राखरांगोळी पाहून त्यांचे मन हेलावून गेले होते. यातून मार्ग कसा काढायचा, कारण बिपीन हा एक विकृत मनाचा असून पावले फार सावधपणे व तत्परतेने टाकण्याची गरज होती. बीपीनचे बिंग सरकारी अधिकाऱ्यांना ते सहजपणे सांगू शकले असते, कारण त्यांचे सरकारी वर्तुळात जबरदस्त वजन होते. पण हा मार्ग मौशूच्या सुटकेच्या दृष्टीने जोखमीचा ठरला असता, बिपीनला धडा शिकविण्याची ही वेळ नव्हती. तेंव्हा योग्य संधीचा फयदा घेऊन ते स्वत;च तिच्या बरोबर दिल्लीला जाणार होते. तेथूनच मुंबईचा मार्ग सोपा व खात्रीचा होता. बिपीन आपल्या बायको मुला बरोबर पुनाखा येथे काही दिवसाकरता जाणार होते. तिला दिल्लीला जाण्याची परवानगी आधीच दिली असल्याने तिचा मार्ग मोकळा होता.
रात्री १० वाजता संगीताचा फोन खणाणाला लागला, अधीर होऊन संगीता बोलू लागली, ” भौशु बेटा मला तुला कधी भेटू असे झाले आहे, तेवढ्यात मौशु कापऱ्या आवाजात बोलू लागली ‘आई मी तुझ्या जीवनात परत आले तर तुला चालेल ना? तुझे कोणाशी लग्न झालेले नाही ना? संगीताच्या रडण्याच्या आर्त स्वराने मौशु घाबरून गेली, आई मी तरी काय करणार? इथे बाबांनी दुसरे लग्न केलेले असून त्यांचा सुखाचा संसार चालला आहे, मी एकाकी जीवन जगत आहे, मौशूला धीर देणे अत्यंत जरुरीचे होते, संगीताने स्वता:ला सावरत फोनवर बोलू लागली, ”अग मीही तुझ्या आठवणी काढत एकाकी जीवन जगत आहे, तेंव्हा तू लवकरात लवकर माझ्याकडे ये, मी चातकासारखी वाट पाहत आहे. तिने तोंगशे यांचे वारंवार आभार मानत केविलवाणी शब्दात विनवणी केली, ” तुम्ही देवदूत आहात, तुमचे अनंत उपकार मी कशी फेडणार? माझ्या मौशूला तुम्ही सुरक्षित पाठवाल याची मला पूर्ण खात्री आहे, देव आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे.
पुढील सर्व जबाबदारी आता तोंगशे यांच्या हातात होती. हजारो मैल दूर फेकलेल्या दोन अभागी मने मिलनाच्या उंबरठ्यावर वाट पाहत होती.
— डॉ. अविनाश वैद्य.
Leave a Reply