नवीन लेखन...

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – ६

त्या तिघांच्या जीवनातील रोजची सकाळ आजही नेहमी प्रमाणे उजाडली होती. मौशु नेहमी प्रमाणे शाळेत जाण्याची तयारी करत होती. बाबा बरोबर मजेत शाळेत गेली. संगीताने नेहमी प्रमाणे १० वाजता घर सोडले. दोघां मध्ये संवादच नसल्याने ती परत केंव्हा येणार वा दुसऱ्या कोणत्याच गोष्टी विचारण्याचा प्रश्नच नव्हता. संगीताची पाठ वळली, आणि त्याच्या सुडाच्या प्रवासाची सुरवात झाली. स्वत:शी छदमीपणे हसत त्याने दोन प्रवासी बॅग भरल्या, सर्व महत्वाची कागदपत्रे, पैसे यांची तयारी आधीपासून केलेली होती दुपारी तिला शाळेतून आणल्यावर तिला आपल्या प्रवासाच्या नियोजनात कसे गुंगवून टाकायचे याची मनात उजळणी करत पलंगावर शांतपणे लवंडला होता. मनात विचारांचा कल्लोळ माजलेला होते, पुढे तर अंधारच अंधार होता, पण त्यात उडी नक्की मारायची या निर्णया बाबत ठाम होता.

मौशूला दुपारी शाळेतून घरी येताना ‘ बबडू तुला गोड बातमी, आज आपण तिघे ट्रेननी कलकत्ता आणि पुढे गंगटोक हिल स्टेशनला जाणार, १५ दिवस नुसती धमाल, शाळेला सुट्टी! तुझे सर्व नवीन कपडे खेळणी बॅगमध्ये भरून जय्यत तयारी झालेली आहे, जेवताना तुझे आवडीचे गुलाबजाम, व आईसक्रिम, मजा आहे एका मुलीची. आई ऑफीस मधून थेट स्टेशन वर येणार आहे.

भरलेल्या बॅगा पाहून ती आनंदाने घरभर आपली गळ्यातील छोटी पर्स घेऊन नाचत होती, एका निष्पाप मुलीचा निष्ठुर कर्दनकाळ बाप एका अघोरी प्रवासाला तिला घेऊन निघाला होता. नियती किती भीषण असू शकते हे उमजण्या पलीकडचे आहे. बिळातील सर्पाला डीवचल्यावर तो फुतकारत सैरावैरा पळू लागतो, त्याला आवरणे फर कठीण असते. त्याच्या सुडाच्या प्रवासात मौशु नाहक बळी पडणार होती, अहंकाराच्या ज्वाला भडकल्या की त्यात कोणाची आहुती पडेल हे आकलनाच्या पलीकडचे असते, सुडाच्या प्रवासाची सुरवात तर झाली होती.

रात्री ९ च्या सुमारास संगीता नेहमी प्रमाणे घरी आली, घराला कुलूप पाहून तिला जरा आश्चर्यच वाटले, घरात शिरताच कपाटातील अस्ताव्यस्त पडलेले सामान पाहून ती हबकलेच, मौशूच्या कपाटाचे दार सताड उघडे, त्यातून एकूण एक फ्रॉक गायब झालेले पाहून तिच्या पायाखालची जमीन दुभंगलीच. मुख्य लॉकर मधील सर्व महत्वाचे कागदपत्र व पैसे सर्व नाहीसे झालेले, मात्र तिचे दागिने तसेच होते, कपाटावरील दोन्ही बॅगा नव्हत्या, संगीता जागच्या जागी कोसळलीच, रिकामी कपाटे पाहत तिने हंबरडा फोडला, पण आवाज ऐकून घेणार कोणी नव्हतंच. मौशूला कोणी पळवून तर नेले नसेल? पण ती घरात एकटी कधीच रहात नसे, आणि दागिने न चोरता चोरीची शक्यता नव्हती. रात्रीचा १ वाजत आलेला तेंव्हा सिनेमा वा हॉटेलला गेल्याचे शक्यताही नव्हती. घटनेचे गूढच उमगत नव्हते, माझ्याबद्दल एवढा मत्सर, घृणा, तिरस्कार वाटत असेल तर मला एकटीला तो छळू शकत होता. निष्पाप मौशुवर का सूड उगवत होता? फोनच्या घंटीकडे आशाळभूतपणे कान देत हुंदके देत होती. घंटी वाजणारच नव्हती. दु:खाच्या महाप्रलयात ती गटांगळया खात होती. प्रत्येक खोली मधील दिवे लखलखत होते, आणि संगीता अंधाराच्या गुहेत खिचपत पडली होती, अशा भयानक अवस्थेत तिने आईला फोन लावला. काही मिनिटे नुसता भयानक रडण्याचा आवाज आई तर पार कोलमडून पडली होती. धाकटा विजय धीराने परीस्थिती हाताळत ते दोघे तडकाफडकी संगीताच्या घरी पोहचले. घटनांची शहनिशा करण्यात रात्र सरले होती, पुढे काय? हा न सुटणारा प्रश्न आ वासून उभा होता. या प्रलयातून सुटका होण्याची सुतराम शक्यता नव्हती, क्रूर नियतिचा फास घट्ट आवळला गेला होता.

— डॉ. अविनाश वैद्य.

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..