ज्यांचे शिक्षण झाले किंवा नाही माहित नसतांना त्यांचे मूल्यमापन करण्याचे आव्हान सध्या आहे.
कॉपी रोखणे जसे ऑफलाईन मध्ये आव्हान होते तसेच आव्हान ऑनलाइन परीक्षा पद्धतीमध्ये ही आहे. ऑफलाइन परीक्षेमध्ये प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्यांना यश मिळत असे पण ऑनलाईन परीक्षेमध्ये अभ्यास न करणारें ही वरचढ ठरत आहेत. परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने घेण्याचा निर्णय विद्यापीठांनी त्यांच्या स्तरावर घ्यावा, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिले आहेत. तसेच नुकत्याच एका वाहिनीने केलेल्या सर्वेक्षणात असे आढळले की ऑनलाइन परीक्षेत विद्यार्थ्यांनी चक्क तंत्रज्ञानालाच दावणीला बांधले आहे. व्हाट्सअप च्या माध्यमातून प्रश्नपत्रिका येते उत्तरपत्रिका सहित त्यामुळे त्याला निर्बुद्ध पणें उतरून काढणे तेवढेच कष्ट विद्यार्थ्यांना घ्यावे लागतात, त्यामुळे गाईड, कोचिंग क्लासेस, २१अपेक्षित इतिहास जमा झाले आहेत. सरकारचे दलाल, व्हाट्सअप दलाल व तंत्रज्ञानाच्या साह्याने विद्यार्थी पुढे जात आहेत. कष्ट करणारा समाज आहे तिथेच आहे.
कष्ट न करणारे,नोकरीच्या सिंहासनावर पैशाने विराजमान होत आहेत. पैशाने शिक्षण आणि नोकरी विकत घेतली जात आहे. टीईटी घोटाळ्यात ८००० च्या वर शिक्षकां कडून पैसे घेऊन अपात्र शिक्षकांना नेमणुका दिल्या गेल्या. कुठेतरी मूल्यशिक्षणच आवश्यक आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेले आज कारागृहात बंदिस्त आहेत.तंत्रज्ञानाने शिक्षणावर इतकी मात केली आहे की शैक्षणिक संस्था यांच्याकडे प्रमाणपत्र देण्याचेही काम राहिलेनाही.
विजेची अनुपलब्धता, नेटवर्क कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे विद्यार्थी अथवा त्याचे कुटंबीय कोरोना बाधित असल्यास किंवा इतर समस्यांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य झाली नाही तर त्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने पुनर्रपरीक्षा घ्यावी. एकही विद्यार्थी परीक्षेपासून संवंचित राहणार नाही,याची दक्षता घ्यावी,असेही शासनाने अध्यादेशाद्वारे स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे केवळ शासन आदेशामुळे विद्यापीठांना ऑनलाईन परीक्षा घ्याव्या लागत होत्या. मात्र, ऑनलाईन परीक्षांमध्ये अनेक तृटी असल्याचे निदर्शनास आले होते. बहुतांश विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. मात्र,त्यामुळे कंपन्यांसमोर या विद्यार्थ्यांना नोकरी देण्याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला. परिणामी कंपन्यांकडून विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. एकूणच ऑनलाईन परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व करिअरच्या दृष्टीकोनातून योग्य ठरत नसल्याचे स्पष्ट झाले.
शैक्षणिक गुणवत्ता राखण्यासाठी; तसेच परीक्षांचा ऑनलाइन दर्जा वाढविण्यासाठी चांगला निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकारांवर विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष राहणार आहे.
विद्यार्थ्यांना अनेक दिवस अभ्यासाला मिळाल्याने, अनेक विषयांच्या परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावर होणार आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. परीक्षेच्या तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी सराव परीक्षा सुरू करण्यात आल्या आहेत.
गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रॉक्टर्ड
या परीक्षा पद्धतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने परीक्षार्थींवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी कॅमेराचा वापर करण्यात येणार असून, विद्यार्थ्याचे काही छायाचित्रे देखील काढण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याव्यतिरिक्त अन्य हालचाली झाल्याचे आढळून आल्यास त्याबाबतचा इशारा विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. साधारण वीस इशारे देण्यात येणार आहे. त्यामुळे या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना गैरप्रकार करता येणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये; तसेच पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांचा दर्जा राखण्यासाठी विद्यापीठाने चांगला निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
ऑनलाइन परीक्षेमध्ये आता कॉपी करणे फौजदारी गुन्हा ठरवण्याचा मुंबई विद्यापीठात विचारही चालू आहे.
गुरूकुल शिक्षण पद्धती मध्ये गुरूंनी शिक्षणाला एक उंची प्राप्त करून दिली होती, आणि आतादलालांनी इतका धुमाकूळ घातला आहे की शिक्षण रसातळाला जात आहे.
TETपरीक्षेत दलाल,म्हाडा परीक्षेत दलाल,RTE मध्ये दलाल.
पैसे देवून अपात्र उमेदवार बोहल्यावर चढत आहेत. कॉपी मुळे अनेक इंजिनीयर, डॉक्टर पु ल कोसळण्याला व रुग्णाच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार आहेत याचे उत्तर दायित्व कोणाचे?अटक करणार्यांनाच अटक होत आहे.
कागदावरच्या गुणवत्तेने देश चालत नसतो,पण चालत आहे.
दलालांचे व्हाट्सअप ग्रुप झाले आहेत प्रश्नपत्रिका पाठवणे व त्याची उत्तरेही पाठवणे ही पैसे कमावण्याचे साधन झाले आहे. अभ्यास न करण्याच्या प्रवृत्तीमुळे एक कुमकुवत समाज निर्माण होतो आहे.
एखाद्या वर्षी आमूलाग्र बदल झाला, तर तो स्वीकारणे सहज शक्य नसते. त्यातून ती परीक्षेसारखी बाब असेल, तर त्याला अनेक फाटे फोडून विरोधच होतो; पण हा बदल काळानुरूप करणे क्रमप्राप्त असेल आणि त्याचे तत्कालिक त्रुटींपेक्षा दीर्घकालीन फायदे अधिक असतील, तर ते स्वीकारणे शहाणपणाचे ठरते.
राज्यातील शिक्षण क्षेत्रात सध्या केजीपासून पीजीपर्यंत आमूलाग्र बदल होऊ घातले आहेत. त्यातील महत्त्वाचा बदल आहे, तो प्रवेश प्रक्रिया आणि परीक्षा या दोन महाकाय प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा. शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित घटकांसाठीच्या २५ टक्के राखीव जागांचे प्रवेश ऑनलाइन करण्याचा प्रयोग सध्या सुरू आहे. राज्यातील विद्यापीठांमध्ये टप्प्याटप्प्याने परीक्षा यंत्रणा ऑनलाइन करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. अगदी उत्तरपत्रिका स्कॅन करून पेपर तपासणीही ऑनलाइन करण्याच्या दिशेने जाण्याचे ध्येय आहे. मुंबईनंतर पुण्यात होऊ घातलेले अकरावीचे ऑनलाइन प्रवेश, पुणे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग विद्याशाखेच्या ऑनलाइन परीक्षा, मुक्त विद्यापीठांची ऑनलाइन लेक्चर्स, अनेक खासगी संस्थांत होणारी व्हीडिओ लेक्चर्स ही काही उदाहरणे शिक्षणातील ‘पेपरलेस गव्हर्नन्स’च्या दिशेने सुरू असलेली वाटचाल आहे, असे म्हणावयास हरकत नाही. त्यातच यंदा भर पडलीये, ती फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए यासारख्या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी झालेल्या आणि होऊ घातलेल्या ऑनलाइन प्रवेश
राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) यंदा प्रथमच त्यांच्या अखत्यारीतील पाचपैकी चार प्रवेश परीक्षा ऑनलाइन घेण्याचा घाट घातला. गेल्या वर्षी एमसीए आणि एमई अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षा ऑनलाइन घेतल्या गेल्या; पण विद्यार्थीसंख्येचा विचार केला, तर यंदाचा प्रयोग निश्चितच मोठा आहे.
ऑनलाइन परीक्षा घेण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातील पारदर्शकता हा सर्वांत महत्त्वाचा फायदा. तातडीने निकाल लावण्यासाठीही ऑनलाइन परीक्षा उपयुक्तच ठरते. य तपासणीतील मानवी चुका टाळणे, कोणत्याही क्रमाने प्रश्न सोडविण्याची मुभा मिळणे असे याचे अनेक फायदे आहेत. विद्यार्थ्यांसाठी यात आणखी एक बाब महत्त्वाची आहे, ज्याचा खरेतर अभ्यास करण्याच्या पातळीपासून विचार व्हायला हवा. पदवीनंतरच्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय परीक्षा या आता ऑनलाइन किंवा कम्प्युटर-बेस्ड स्वरूपातच द्याव्या लागतात. ‘कॅट’, ‘जीआरई’, ‘टोफेल’ या परीक्षांची उदाहरणे बोलकी आहेत. त्यांना सामोरे जाण्याची मानसिक तयारी या निमित्ताने होणार आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
ऑनलाइन परीक्षा या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीच्या (ऑब्जेक्टिव्ह) प्रश्नांच्या परीक्षेसाठी उत्तम असल्या, तरी सब्जेक्टिव्ह किंवा दीर्घोत्तरी प्रश्नांच्या परीक्षेसाठी त्यांचा काय फायदा, असा प्रश्न उरतोच. परीक्षा ही केवळ पर्याय निवडण्याची असू शकत नाही. पदवीच्या पातळीवर विषयाची समज तपासण्यासाठी विद्यार्थ्यांची दीर्घोत्तरी प्रश्नांद्वारे चाचणी घेणे महत्त्वाचे आहे. अर्थात, पेपर लिहिणे ऑनलाइन करता आले नाही, तरी पेपर तपासणी मात्र ऑनलाइन करून निकाल लावण्यातील वेळ वाचू शकतो, हेही यंत्रणांनी लक्षात घ्यायला हवे.
प्रस आहे यंत्रणेच्या प्रभावी अंमलबाजवणीचा व प्रामाणिकपणाचा. यंत्रणेच्या प्रभावी अंमलबजावणीवर अजूनही विद्यार्थी-पालकांचा विश्वास नाही. कर्मचाऱ्यांचे योग्य प्रशिक्षणही व्हायला हवे आणि त्यासाठी त्यांना विश्वासात घेऊनच ऑनलाइनचा विचार हवा. अन्यथा, आयत्या वेळी सर्व्हर डाऊन होणे, विद्यार्थ्यांची नोंदणीच न होणे यासारखे प्रकार घडू नयेत.,यात नुकसान विद्यार्थ्यांचेच होते, हे लक्षात घ्यायला हवे. पध्दत कोणतीही असो, विद्यार्थी हा आपला केंद्रबिंदू आहे, याचे भान सुटता कामा नये.
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या (डीटीई) वतीने शैक्षणिक वर्ष २००४-०५ पासून सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमार्फत (कॅप) ऑनलाइन पध्दतीने करण्यात आले.
आतापर्यंत होत असलेल्या पेपर-पेन पध्दतीत प्रवेश परीक्षा सर्व केंद्रांवर एकाच वेळी घेतली जाते. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका व उत्तर पत्रिका (ओएमआर शीट) सर्व परीक्षा केंद्रांवर पुरविण्यात येतात. त्यानंतर सर्व उत्तरपत्रिका एकत्रित करण्यात येऊन ओएमआर मशीनवर तपासणी करण्यात येऊन निकाल जाहीर करण्यात येतो. विद्यार्थीसंख्येनुसार तीन ते पाच आठवडयांचा कालावधी लागतो.
ऑनलाइन पद्धतीने प्रवेश परीक्षा अनेक सत्रांत राबविण्याची सुविधा प्राप्त होते. ऑनलाइन पद्धतीत एकाच प्रश्नपत्रिकेऐवजी प्रश्नांचा एक संच वापरण्यात येतो. तो काठिण्य पातळीनुसार दोन किंवा त्यापेक्षा जास्त विभागांत वाटण्यात येतो व त्यातून प्रश्नांची निवड करण्यात येऊन बहुपर्यायी प्रश्नांची प्रश्नपत्रिका सत्रनिहाय विद्यार्थ्यास उपलब्ध करण्यात येते. या पध्दतीमुळे परीक्षा एकाच सत्रात न घेता, आवश्यकतेनुसार एका ठराविक कालावधीत दोन किंवा त्यापेक्षा जास्त सत्रांत घेणे सहज शक्य होते.
ऑनलाइन पद्धतीत प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना लॉगइन केल्यानंतरच दिसू लागते. परिणामी, पेपरफुटीचा धोका टळतो; तसेच प्रश्नाचा क्रम बदलता असल्याने विद्यार्थ्यांना शेजारच्या विद्यार्थ्याचे उत्तर कॉपी करणे शक्य होत नाही.
ऑनलाइन पध्दतीचा आणखी एक फायदा म्हणजे निकाल वेळेवर व बिनचूक लावता येतात. निकाल ऑनलाइन पध्दतीने तयार होत असल्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘एसएमएस’द्वारे तो कळविला जातो; तसेच ऑनलाइन पध्दतीने परीक्षा घेतल्यामुळे एका आठवडयात परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येतो. जाहीर झालेला निकाल ऑनलाइन ‘कॅप’करिता बिनचूकपणे वापरता येतो. प्रवेश परीक्षेतील गुण बिनचूकपणे प्रवेश प्रक्रियेतील ऑनलाइन अर्जामध्ये नमूद करता येत असल्यामुळे पुढील संभाव्य चुका व नुकसान टाळले जाते.
ऑनलाइन पध्दतीने घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल संगणकीय प्रणालीवर उपलब्ध होत असल्यामुळे तो साठवून ठेवणे, त्या माहितीच्या आधारे सांख्यिकी माहिती तयार करणे, त्या माहितीवर पुढील धोरणे ठरविणे (उदाहरणार्थ, षटीप्रवर्गनिहाय उत्तीर्ण होणारे विद्यार्थी, ठराविक गुण/श्रेणी प्राप्त करणारे विद्यार्थी, प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्या विचारात घेऊन शुल्क प्रतिपूर्तीसाठी अंदाजित रक्कम ठरविणे इत्यादी) या बाबी करता येतात.
परीक्षेतून विद्यार्थी तावून सुलाखून निघायला हवेत, सुखावून नव्हें.या बाबी लक्षात घेऊन पावलं उचलली गेली पाहिजेत, तरच देशाला चांगले दिवस येणार आहेत.
— डॉ अनिल कुलकर्णी.
Leave a Reply