कुठे काय अन कुठे काय
पैशाला येथे फुटले पाय
दीड-दोन दमडी साठी
ईमान येथे विकला जाय
कुठे काय अन कुठे काय
सत्य झाले मिथ्य, मिथ्यस मानले तथ्य
मक्कारी दुनिया करे खोट्याचे नेपथ्य
चौका चौकां मध्ये असत्या चा
पोवाडा आता गायला जाय
कुठे काय अन कुठे काय
जुने गीत, नवीन संगीत
चोरीस आम्ही नाही भित
नाविण्य आला नाही संधी
हुन्नर येथे लयाला जाय
कुठे काय अन कुठे काय
कसला छंद, ही कसली धुंदी
नशेच्या बाजारातील हे सगळे नंदी
दिवसा ढवळ्या या पोळ्यांचा
रंगा नाच रचला जाय
कुठे काय अन कुठे काय
लोकांचे राज्य, पोसले राजे
जाे तो स्वार्थाची पोळी भाजे
तळागाळातील लोकांन साठी
येथे कोणी वाली नाही
कुठे काय अन कुठे काय
तर्काचा बाेध, उत्तरांची शोधा शोध
विज्ञानाच्या नावे सोडला प्रबोध
आधुनिकतेच्या पायाखाली
नैतिकता ही चिरडली जाय
कुठे काय अन कुठे काय
नवा दिवस नवीन प्रीत
रोज हवा नवीन मित
वासनेच्या लाटेवरती
मन मात्र पोहोत जाय
कुठे काय अन कुठे काय
कुठे काय अन कुठे काय
सगळच येथे जुनेच हाय
तुम्हीच तुमचं बघा विनोद बाबू
बाकी दुनिया भाड मे जाये
— विनोद खराडे
Leave a Reply