कुठे नाही स्वरूप देवा, बघायला मिळत आम्हा,
काळीज नमते तुज पाहता,
चराचरातील या घटका, —
निसर्ग मज वाटतो,
तुझेच रुप देवा,
तिथेच आम्ही तुला मानतो,
स्वरूप कोणते का असे बा,
ना तू कुठल्या देवळा,
ना कुठल्या मंदिरी,
प्रत्येकाच्या हृदयी
बसशी,असशी तू हरी,—-
प्रेम, माया, ममता,
आपुलकी, जिव्हाळा,
कुठे तू नसशी
फक्त सांग मज गा ,—!!!!
माणुसकी जे जपती,
त्यांच्या मनोमनी तू ,
दया करुणा अहिंसा,
दाखवीत प्रगटशी तू,–!!!.
अनोळखी हात करता,
निरपेक्ष ती सहाय्यता,
बापुड्या दीन -दुबळ्या,
जिवांचा तू रक्षण कर्ता,–!!!
संकटात कोण पुढे येई,
कोण देईल अमोल दिलासा,
कोण आपला हात देई,
असता कुठली अवघड वेळा,–!!!
वैविध्य अन् वैचित्र्य ,
पाहुनी माणूस चकित होई,
कोण नेई शेवटास,
जिंकता जरी कुठली लढाई,–!!!
नीतिमत्तेची चाड नसता,
कोण ओढे फटकारे,
आत्म्यातला परमात्माच दाखवी, आपुले अस्तित्व बरे,–!!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply