कांही दिवसांपूर्वी आपण वर्तमान पत्रात खालील बातम्या वाचल्या असतील: – मुंबईत बावीस भटक्या कुत्र्यांवर एका छोट्या उद्योजकाने सल्फ्युरीक असिड फेकून कुद्र्यांचे अंग भाजले. त्यामुळे ते कुत्रे तात्काळ मरण पावले. अशा या भीषण प्रकारात सहा कुत्री गतप्राण झाली तर पाच कुत्र्यांची स्थिती गंभीर होती.
मुंबईत ओशिवरा येथे कुत्र्यांच्या सात पिल्लांना पोत्यात भरुन त्यांच्यावर केरोसिन ओतून जाळण्याचा प्रयत्न केला.
मुंबईतच एका इसमाने आपल्या घरातील मोठ्या सुरीने एका कुत्र्याला भोसकले. भटक्या कुत्र्यांना कंटाळून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठिकठीकाणी काही नागरीक असा अघोरी उपाय करीत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. घडणार आहेत. अशा प्रकारच्या अनेक घटना घडून सुध्दा प्रसिध्दी माध्यमांव्दारे त्याला प्रसिध्दी मिळत नाही. ज्या बातम्या वर्तमान पत्रात प्रसिध्द होतात त्याच आपल्याला कळतात. पण प्रसिध्द न झालेल्या बातम्या आपल्याला माहित सुध्दा होत नाहीत.
मुद्दा असा की, अशा घटना ज्याप्रमाणे इतरत्र घडतात तशाच आपल्या शहरात ही घडल्या आहेत, घडत आहेत आणि भविष्यात घडतही राहतील. प्रश्न हा निर्माण होतो की, अशा घटना का घडतात? त्यांची प्रमुख कारणे पुढील घडलेल्या घटना उदाहरणार्थ म्हणून असू शकतात. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर नगरपालिकेच्या हद्दीत सोनीवली या गावात साहेबराव अडांगळे या मजुराची एकुलती एक मुलगी आपल्याच घराच्या अंगणात खेळत असताना तेथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने तिचे पाय, मान आणि तोंडाचे लचके तोडण्यास सुरवात केली व तिच्या नरडीचा कडकडून चावा घेतला. त्यामुळे ती मुलगी जागीच गतप्राण झाली. या घटनेने त्या मुलीच्या आईवडीलांवर काय आकाश कोसळले असेल याची आपण कल्पना सुध्दा करु शकत नाही.
कल्याण येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे एक न्यायाधीश कोर्टाच्या आवारात शिरत असतानाच त्यांना एका भटक्या कुत्र्याने लक्ष्यकेले. त्या कुत्र्याने कशाचीही तमा न बाळगता त्या न्यायाधीशांच्या पायाला कडकडून चावा घेतला. यामुळे संतप्त झालेल्या न्यायाधीश महोदयांनी भटक्या कुत्र्यांचा चोख बंदोबस्त कायमचा करा या आशयाचे खरमरीत पत्रच कल्याण डोंबिवली महानगर पालिका व राज्य शासनाला सादर केले. अगदी अलिकडची एक घटना. एका शाळकरी मुलीला शाळेत पोहचायला उशीर झाला म्हणून ती रस्त्याच्या कडे-कडेने सकाळच्या वेळेत धावत निघाली. पाठीवरच न सांभाळता येणार दप्तर सांभाळताना तिची तारांबळ उडत होती. कदाचीत तिच्या पायातील बुटांच्या आवाजाने सकाळी रस्त्याच्या आसपास रात्रीच्या जागरणाने दमून झोपलेल्या कुत्र्यांच्या टोळीची झोप मोडली असावी त्यामुळे ही श्वान मंडळी उठून त्या धावणाऱ्या मुलीच्या मागे लागली. दप्तराच्या ओडझ्यामुळे मुलीच्या धावण्याचा वेग कमी असल्या कारणाने कुत्र्यांनी तिला गाठल आणि तिच्या शरीराला चावे घेतले. परीणाम ती मुलगी अनेक दिवस शाळेत जावू शकली नाही. परीक्षेला बसू शकली नाही. त्यामुळे तिचे महत्वाचे एक वर्ष वाया गेले.
विक्रोळी येथे गोदरेज कॉलनी जवळ राहणाऱ्या रशीद खान यांची मुलगी आपल्याच मोठ्या बहिणीबरोबर घराजवळ खेळत असताना एका कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला आणि तिला इतके जखमी केले की त्या मुलीला तात्काळ राजावाडी हॉस्पिटल मध्ये भरती करावे लागले. तिच्या चेहऱ्यावर एवढ्या जखमा झाल्या की, डॉक्टरांनी तिला ई. एन. ठी वॉर्ड मध्ये ठेवले आणि तिच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करण्याचा सल्ला दिला.
रस्त्यावरुन जाताना जनतेला या कुत्र्यांच्या गँंगची आवड निवड सांभाळावी लागते. त्यांना जोरात गेलेली स्कुटर, रिक्षा किंवा तत्सम वाहन मुळीच आवडत नाही. वाहन जोरात रस्त्याने जायला लागली की, ही मंडळी जीव घेवून त्या वाहनामागे धावायला लागतात. अशा वेळी दोन चाकी वाहनवाल्यांची अवस्था अतिशय बिकट होते. मागे लागलेले कुत्रे पायाला चार्वणार तर नाही ना, इकडे लक्ष ठेवायचे की, समोरच्या रस्त्यावर लक्ष ठेवायच ही कसरत सांभाळताना जर एकमेव उपचार होता. त्यानंतर मॉडर्न सेलकल्वर व्हॅक््टिन वापरात आले. जागतिक आरोग्य संघटनेने १९९७ साली न्युरल टिश्यू व्हेक्सिनचे उत्पादन थांबविले जावे अशी शिफारस केली. आता पोस्ट एक्सपोजर ट्रीटमेंट (पेट) ही उपचार पध्दती अवलंबिली जाते. प्युरीफाईड चिक एम्ब्रोयोसेल कल्वर हे व्हॅक्सिन या पध्दती अंतर्गत वापरले जातात. पूर्वी पोटात दहा ते चौदा इंजेक्शन घ्यावी लागत त्या ऐवजी या नव्या व्हॅक्सिनमुळे दंडावर पाच इंजेक्शन घेतली तरी चालू शकतात.या व्यतिरीक्त जनतेने कचरा कुंड्यात फेकलेले अन्न व अन्य पदार्थांमुळे भटकी कुत्री पोसली जातात तसेच त्यांची संख्याही वाढत जाते. ही कुत्री कुंडीतला कचरा इतरत्र पसरवून त्याचा प्रादुर्भाव निर्माण करतात. त्यामुळे शहरात रोगराई पसरण्यास मदत होते ते वेगळे. शिवाय ही भटकी कुत्री अनेक रोगांनी पछाडलेली असतात त्यामुळेही जनतेला त्याचा त्रास होऊन त्यांच्या जीवावर बेतू शकत. परदेशात भटकी कुत्री हा प्रकार नसून त्यामुळे तेथे या कुत्र्यांपासून पसरणारे रोग आढळत नाहीत.
कुत्र्यांपासून रोज विष्ठा व तेव्हढेच मुत्र वातावरणात पडते, त्यातून लेप्टोस्पायरोसिस, सॅलमोनेलायसिस या सारखे किमान आठ प्रकारचे रोग पसरतात. या व अशा अनेक कारणांमुळे कुत्र्यांबद्दल जनतेमध्ये भिती, घृणा, संताप, असंतोष निर्माण होत आहे. त्यासाठी यावर उपाय करणे अत्यंत गरजेचे वाटत आहे. या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस इतका असह्य झाला आहे की, त्याचा बंदोबस्त केलाच पाहिजे अशी मानसिकता निर्माण झाली आहे. त्यासाठी त्या कुत्र्यांना ठार मारण्यावाचून दूसरा पर्याय नाही अशी भावना प्रत्येक नागरीकाच्या मनात घर करू लागली आहे कुत्र्यांना ठार मारण हे जस प्राणी मित्रांना आवडणार नाही तसेच इतरांनाही आवडणार नाही. शिवाय तशी न्यायालयाने कुत्र्यांना ठार मारणे यावर बंदी घातली आहे. म्हणून मी या लेखाच्या शेवटी काही उपायसुध्दा सुचविले आहेत. कदाचित त्यावर मतभिन्नता होऊ शकते वा विरोधही होऊ शकतो.
माझ्या माहिती प्रमाणे ठाण्यात कुत्र्यांच्या संख्येचा सर्वे झालेला नाही. ४० टक्के कमिशन मिळविण्यासाठी गुंतलेल्या लोकप्रतिनिधिंना त्याची गरजच भासत नाही. शिवाय तो कुणी करायचा असा प्रश्न असल्याने त्याची नेमकी आकडेवारी मिळत नाही. पण परवाच वर्तमानपत्रात प्रसिध्द झाल्याप्रमाणे एकट्या ठाण्यात ४० हजार कुत्रे आहेत. त्यात दरवर्षी सुमारे एक हजार कुत्री सरासरी चार पिल्लांना जन्म देतात. यावरुन आपल्याला कल्पना करता येईल की, कुत्र्यांची संख्या किती झपाट्याने वाढत आहे. पूर्वी दरवर्षी ५ हजार कुत्री मारली जायची. परंतु ५९९५ पासून ५० हजार कुत्री मारली गेली नाहीत. यामुळे भटक्या कुत्र्यांनी किती उच्छाद मांडला आहे याचीही कल्पना सहजपणे येऊ शकते. या उपद्रवी ठरणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका प्रशासनाचे सध्याचे उपाय कुचकामी ठरव आहेत असेलक्षात येते. याचे कारण कदाचित या प्रश्नावरील प्राणीमित्र संघटनांची ताठर भूमिका व मुंबई उच्च न्यायालयातील एका प्रकरणातील प्रलंबित निकाल. यामुळे हा प्रश्न नजिकच्या काळात तरी मार्गी लागण्याची चिन्हे नाहीत कुत्र्यांना मारु नये म्हणून हा प्रश्न न्यायालयात नेल्यानंतर महापालिकेने भटक्या कुत्र्यांना मारण्याचे काम बंद केले आहे. १९९८ पासून न्यायालयाने कुत्र्यांना मारण्यास केलेली मनाई व विविध कारणांमुळे कुत्र्यांचे मोठ्या प्रमाणावर निर्बिजीकरण करण्यात आलेले अपयश यामुळेही कुत्र्यांची संख्या वाढतच आहे.
काही संख्या या कुत्र्यांचे निर्बिजिकरण करण्याचे काम शहरातील काही स्वयंसेवी संस्थांकडे सोपविण्यात आले होते. पण या संस्थामार्फत दरमहा ५० कुत्र्यांवर देखील ही शस्त्रक्रीया पूर्ण केली जात नाही अशी माहिती आहे कदाचित कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी साधःरणपणे रु. ७०० ते रु. ८०० येणारा खर्च तसेच, निर्बिजीकरण केलेल्या कुत्र्याला कमींत कमी सात ते दहा दिवस देखरेखीखाली ठेवावे लागते. त्यामुळे जास्त संख्येने कुत्रे कॅनलमर्ध्ये सामावून घेता येत नाही अशा यांच्यापुढील अडचणी पाहता भटक्या कुत्र्यांच्या वाढीला रोखणे सर्वथा अशक्य असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. बिगर सरकारी संस्था करीत असलेल्या निर्बिजीकरणाच्या आकडेवारीवर नजर ठाकली असता केवळ निर्बिजीकरणाने भटक्या कुत्र्यांची समस्या निपटता येईल का? असा प्रश्नउभा राहिला आहे.
मुंबईसारख्या शहरात वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग
(डब्लू-एस्.डी.) अथवा बी.एस्-पी.सी.ए., आय.डी.ए. व अहींसा या संस्था निर्बिजीकरणाचे काम करीत आहेत. त्यांच्या आकडेवारीवरुन दोन हजार सालात केवळ ५७०८ कुत्र्यांचे निर्बिजीकरण केल्याचे कळते म्हणून यावर उपाय म्हणंजे भटक्या कुत्र्यांचे प्रमाण शुन्यावर आणावे लागेल आणि त्यासाठी विनाकारण अतिभावनावश होऊन चालणार नाही, एका वर्षात कुत्र्यांची संख्या तिपटीने वाढते. त्यांना रेबिज प्रतिबंधक लस दिली तरी तिचा प्रभाव सहा महिने ते एक वर्षापेक्षा जास्त टिकत नाही. यावर निर्बिजीकरणासाठी धरावे किंवा ठार मारावे हे दोनच उपाय आहेत. मात्र जनतेने संरक्षण दिलेली कुत्री वगळून अन्य ठार करावित. त्यांना ठार मारण्यावाचून पर्याय नाही. अशीच तीव्र भावना अनेक नागरीकांची आहे. कुत्र्यांना ठार मारावे यावरुन प्राणीमित्र संघटना व व्यक्ती खळवळून उठतील याची मला कल्पना आहे यावर त्यांचे म्हणणे पुढीलप्रमाणे असू शकते. या कुत्र्यांना जीवे मारणे पर्याय नाही. तर भटक्या कुत्र्यांचे मालक बनत नसाल तर कमीत कमी पालक तरी व्हा अफगाणिस्तानात बुध्दाची मूर्ती मुसलमानांनी भंग केली म्हणून आपण इथे हळहळ व्यक्त करतो. पण जिवंत कुत्र्यांबद्दल आपल्याला कळवळ वाटत नाही. गांधीजींच्या या देशात कुत्री ठार मारणे योग्य आहे का? लेप्ठोस्पायरोसिसची लागण केवळ कुत्र्यांमुळेच माणसांना होते अस नाही तर॑ गायी म्हशींचा वावर असलेल्या ठिकाणी सुध्दा या रोगाची लागण होऊ शकते. रेबीज हा रोग केवळ कुत्र्यांपासून नव्हे तर डुक्कर, वटवाघळे, मांजरे आदी अन्य प्राण्यांपासूलही पसरतो. मग कुत्र्यांनाच का मारावे? जो उठतो तो भटकी कुत्री ठार मारण्याची वार्ता करतो पण या कुत्र्यांचा चांगल्या कामासाठी वापर करता येईल. कुत्रा जर चावलाच तर इंजेक्शन घेवून माणूस बरा होतो. कायमचा बिछान्यावर पडून राहत नाही. भटक्या कुत्र्यांचे आयुर्मान केवळ दहा वर्षाचेच असल्याने या दहा वर्षात तो किती जणांना चावू शकतो? जगात काय केवळ कुत्रे चावल्यानेच माणसे मरतात? रेल्वे अपघात, आजारपण याने कुणीच मरत नाही? ही झाली कुत्र्यांना मारू नये यांची भूमिका. पण यांना विरोध करणारे असे म्हणताना आढळतात. आणि त्यात तथ्य ही आहे. ते तथ्य काय आहे ते पुढे पाहू. फक्त कुत्रे मारण्यावरच बंदी का?बकऱ्या, गायी, कोंबड्या, समुद्रातील मासे यांनी काय पाप केले? त्यांना का मारता? तसे पाहता वरिलपैकी कुणीही माणसांना चावत नाही. त्यांच्यामुळे माणसे मरत नाहीत किंवा त्यांच्यामुळे कुणाला फारसा त्रास सुध्दा होत नाही. याचा अर्थ सरळ हा आहे की, तुमच्या जीभेचे चोचले पुरवायचे आहेत म्हणून बकरे, मासे, कोंबड्या यांना मारले तर चालते. गाय तर या आपल्या हिंदुस्तानातील कोट्यावधी हिंदूंची गोमाता आहे. त्यांच दैवत आहे. एका विशिष्ठ धर्माचे लोक जेव्हा गाईची कत्तल करतात तेव्हा या प्राणीमित्रांचा साधा हुकारही येत नाही. उलट गाई मारण्यास विरोध करणाऱ्यांना जातीयवादी हिणवून त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या जातात.
भटकी कुत्री आसऱ्या अभावी उकीरड्याचा आश्रय घेतात. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र केलेली घाण ते कुत्रे पुन्हा पसरवितात त्यामुळे आपोआप रोगराईला आमंत्रण मिळते. तसेच माणसांना चावून सुध्दा रोग पसरवितात. मुंबई महापालिकेच्या ५९८८ साली तयार केलेल्या अधिनियमाच्या कलम ३८० नुसार मच्छर, कलम ३८४ नुसार डुकरे आदि प्राणी मारले जातात. याच अधिनियमाच्या कलम १९१ (अ) आणि (ब) नुसार कुत्री पकडून ठार मारण्याची तरतूद केलेली असताना कुत्री मारण्यावर बंदी का?
रोगग्रस्त, पिसाळलेले आणि आक्रमक कुत्र्यांना तर नक्कीच ठार मारले पाहिजे. श्वान प्रेमिंनी कुत्र्यांवर प्रेम करण्यासोबत त्यांच्या पालनाचीही जबाबदारी घ्यावी. त्यांना जर कुत्र्यांवर एवढंच प्रेम करायच असेल तर त्याची किंमतही मोजायला तयार रहायला हव. मनुष्य हा प्रथम माणसांसाठी आहे. आपल्या देशात अनेक अनाथ मुले आहेत त्यांच्याबद्दल ही मंडळी सहानुभुती का दाखवित नाही? अनेक लहान बालकांना कुत्र्यांनी चावे घेवूज़ ठार केल्याच्या घटना रोज घडत आहेत. याची जबाबदारी हे श्वानप्रेमी घेतील कां?
या श्वानप्रेमींवर कुत्र्यांच्या या कृत्याबद्दल पोलिसात गुन्हे दाखल करावेत कां? कुत्र्यांच्या उपद्रवाबद्दल अनेक तक्रारी येतात तेव्हा या श्वानप्रेमींनी आपली नावे जाहीर करावित जेणेकरुन त्यांच्याकडे ही भटकी कुत्री पाळण्यासाठी पाठविता येतील. कुत्र्यांना विश्वासू म्हटल जात. यावर कुणाचे दुमत नाही. म्हणून क़राही कुणी कुत्र्यांना घरात ठेवून घरातल्या व्यक्तिवर अविश्वास दाखवत नाहीत किंवा आपल्या घरात माणसांना जन्म घालतात, कुत्र्यांना जन्म घालत नाही समाजात देखील जी माणस समाजविरोधी काम करतात, खून करतात, खंडण्या मागतात, गुंडगिरी करतात अशा प्रत्यक्ष मानवाला पोलिस गोळ्या घालून ठार मारतातकिंवा शिक्षा म्हणून फाशी देतात. तेव्हा या अपराध्यांबद्दल प्राणीमित्रांना सहानुभूती वाटते? या प्राणीमित्रांच्या घरातल्यापैकी कुणाचे एकुलते एक मुल कुत्रा चावून मेले तर हेच लोक कुठ्र्यांवर दया करा असे सांगतील का?
हे ही मान्य आहे की, लेप्टोस्पायरोसिस गायी, म्हशींमुळे होऊ शकतो. पण गायी म्हशी या गोठ्यात बंदिस्त असतात. त्यांचा जनतेला त्रास नाही. शिवाय गाई म्हशींमुळे दुध मिळते. दूधाची अवश्यकता सर्वांना असते. दुध हे पूर्णान्न आहे. कुत्र्याचे दुध कुणी पीत नाही. कुत्र्यांना चांगल्या कामासाठी वापराबाबत सांगायच झाल तर कुत्र्यांचा कोणत्या चांगल्या कामासाठी फायदा? आणि जिथे होतो त्याचे किती टक्के प्रमाण आहे भारतीयांना इंग्रजांचे फार आकर्षण. त्यामुळे ते कुत्रे पाळताना सुध्दा डॉबरमॅन, पामेरीयन अशा परदेशी जातीची कुत्री पाळतो. त्यामुळे गावठी कुत्र्यांना रस्तो-रस्ती बेवारशाच जीण जगाव लागत. इतंकी चर्चा झाल्यानंतर पुन्हा प्रश्न हाच निर्माण होतो की, अशा कुठ्र्यांना धरावे की मारावे? किंवा अशा कुठ्र्यांवर सर्वसंमत उपाय आहे की नाही? त्यावर उपाय आहे. हो त्यावर उपाय आहे. ते कोणते ते आता पुढे पाहू. यावर जालीम एक उपाय म्हणजे, अशा कुत्र्यांना ठारच मारणे. पण न्यायालयाने तशी सध्या बंदी घातल्यामुळे ते शक्य नाही. पण जे शक्य आहे त्याचा विचार करायला काही हरकत नाही. पण ते करण्यासाठी मानसिक तयारी करावी लागेल सर्वप्रथम जनतेमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. समस्या भटक्या कुत्र्यांची असल्याने जनतेच्याच सहकार्याने त्यावर मात करता येईल. मुके प्राणी हे आपले सोबती असले तरी भटक्या कुत्र्यांबाबत निर्बिजीकरण हा एकमेव उपाय होऊ शकत नाही. त्याची कारणे वर दिलेली आहेत. श्वानप्रेमींबद्दल आदर असला तरी अशा मंडळींची संख्या फार मर्यादित आहे.
कुत्र्यांच्या समागमाचा महत्वाचा काळ म्हणजे भाद्रपद महिना. या काळात कुत्र्यांना गर्भनिरोधक गोळ्या खावू घालता येतील कां? हा प्रयत्न सुध्दा करावा उरलेले अन्नपदार्थ उघड्यावर फेकले जाणार नाहीत याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. जेणेकरुन भटकी कुत्री त्या अन्नावर पोसली जाणार नाहीत. रस्त्यावर त्यांना अन्नच मिळाले नाही तर त्यांना नैसर्गिक मृत्यु येऊ शकतो. पाश्चात्य कुत्री पाळणाऱ्यांकडून व त्यांची पैदास करणाऱ्यांकडून महापालिकेने जबर करवसुली करावी आणि त्या उत्पनातून देशी भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे कार्यक्रम राबवावेत. जेणेकरुन महापालिकेवर आर्थिक बोजा पडणार नाही. पूर्वी कुत्री पाळण्यासाठी काही रक्कम महापालिका आकारत असे आणि तसा रीतसर परवाना दिला जात असे. मात्र १९९४ साली न्यायालयाने कुत्री मारण्यास स्थगिती दिल्याने.या परवान्याची गरज लोकांना भासेनाशी झाली. त्याचा परिणाम म्हणजे महापालिकेचा महसुल घटला. महाराष्ट्रात पाच पशुवैद्यकीय महाविद्यालयातून दरवर्षी बाहेर पडणाऱ्या ७० ते ९० डॉक्टरांना निर्बिजीकरणाच्या मोहिमेत सामिल करुन घेता येईल. सध्या शहरात आणखी एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे ती म्हणजे राष्ट्रीय अभयअरण्यातील वाघ व इतर हिंस्त्र प्राणी मानवी वस्तीत, सोसायट्यांमध्ये सर्रास प्रवेश करतात. याचे एकमेव कारण म्हणजे त्या वाघांना अभयारण्यात त्यांना लागणारे भक्ष न मिळणे. हे वाघ शहरात येतात त्यामुळे मानवाला त्यापासून भिती व जीवास धोका निर्माण झाला आहे. जर हे भटके कुत्रे पकंडून या राष्ट्रीय उद्यानात नेवून सोडले तर त्या कुउ्र्यांना नैसर्गिक मृत्यु येईल. वाघ व सिहांना खाद्य उपलब्ध होईल. आणि हे हिंस्त्र प्राणी शहरात प्रवेश करणार नाहीत. शिवाय आपल्या राष्ट्रीय प्राण्याला उपाशी न मारल्याबद्दल पुण्य मिळेल ते वेगळे. सर्वात उत्तम आणि महत्वाचा पण थोडासा खर्चिक असा उपाय आहे तो म्हणजे, ज्याप्रमाणे वृध्दांसाठी वृध्दाश्रम, अनाथ, दलित, आदिवासी विद्यार्थी तथा मुलांसाठी आश्रमशाळा उघडल्या आहेत, तशा भटक्या कुत्र्यांसाठी सुसज्ज अशी श्वान आश्रमशाळा सुरु करता येईल. त्यात पुरेसे अन्न, सकस आहार, औषधपाणी यांची व्यवस्था करावी. या कामी लागणारा खर्च केंद्रीय पशु कल्याण विभागामार्फत मिळू शकतो. समाजात अशी अनेक माणस आहेत की, ते रोज कुत्र्यांसाठी दूध, बिस्कीट, पाव व इतर अन्न मोठ्या आवडीने खावू घालत असतात. अशा व्यक्तिंना भेटून हेच अन्न श्वान आश्रमातील कुत्र्यांना घालण्यास सांगावे जेणेकरुन महापालिकेवर खर्च कमी करण्याची वेळ येईल. जर महापालिका श्वान आश्रम बांधू शकत नसेल तर अशा अनेक स्वयंसेवी संस्था या कामी पुढे येऊ शकतात. त्यांना महापालकिने नाममात्र दराने वा भाड्याने भूखंड उपलब्ध करुन द्यावा. त्यामुळे या आश्रमशाळेत महापालिका हद्दीतील सर्व भटकी कुत्री ठेवता येतील. यामुळे सर्व प्राणिमित्र, अहिंसावादी आनंदी होतील. . शेवटी महापालिकेची सेवा ही जनतेसाठीच असते. त्यात आणखी एक सेवा जोडली जाईल. आणि नागरीक कुत्र्यांच्या त्रासापासून कायमचे मुक्त होतील. काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात बातमी वाचली की, फक्त कुत्र्यांसाठी ठाणे महानगरपालिका स्वतंत्र होस्पिटल सुरु करणार आहे. त्यात भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करण्याचा प्रयोग राबवणार आहे. दिवसाला किमान दहा तर जास्तीत जास्त पन्नास कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया या हॉस्पिटलमध्ये. करण्यात येणार आह त्यांच्यावर उपचारांबरोबर त्यांची देखभालही केली जाणार आहे. मी केलेल्या पाहणीचा अभ्यास केल्यानंतर मला तरी चित्र स्पष्ट दिसत की, महापालिका होस्पिटलसाठी करत असलेला खर्च पूर्णपणे वाया जाणार आहे. ते करीत असलेला प्रयोग केवळ प्रयोगच राहणार आहे. कारण नसबंदीची शस्त्रक्रीया वर उल्लेख केल्याप्रमाणे कुचकामी ठरणार आहे. शिवाय जो मूळ प्रश्न आहे तो या हॉस्पिटलने सुटणार नाही. उलट कुत्र्यांची देखभाल, उपचार, त्यांना दिल जाणार खाण, कुत्र्यांच्या डॉक्टरांचे मानधन, हॉस्पिटलचा मेंटनन्स या सर्वाचा खर्च दर महिन्याला पंचवीस ते तीस लाखापर्यंत जाणार आहे. त्यापेक्षा वर उल्लेख केलेल्या श्वान आश्रमशाळेचे उपाय सर्वांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहेत.
तसा प्रयत्न मुंबई महानगरपालिकेत सुरु झाला असून स्वयंसेवी संस्थांना पाच व्हॅन आणि पाच ते पंधरा एकर जागा उपलब्ध करुन देता येईल का, अशी न्यायालयाकडून विचारणा करण्यात आल्याचे समजते. असच जर ठाणे महानगरपालिकेच्या बाबतीत घडल तर भविष्यात असा प्रश्न पडणार नाही की, कुड्र्यांना धरावे की मारावे?
विद्याधर ठाणेकर
Leave a Reply