परकीय आक्रमकांच्या क्रूरतेला आणि फितुरांच्या कटकारस्थानाला, संघटीत शक्तीनिशी विरोध झाला असता तर आज श्रीविष्णू मंदिराच्या ठिकाणी कुतुबमिनार उभे नसते.
प्राचीन भारतीय हेमाडपंथी शैलीची मंदिरे पाहिल्यास आपल्याला उत्कृष्ट कलेची ओळख होते. कुतुबमिनार पाहतांना मात्र क्रूर आक्रमकांनी केलेल्या दुष्कृत्यांची प्रचीती आल्याशिवाय राहत नाही.
परिसरात बारकाईने लक्ष दिल्यास प्राचीन मंदिराचे हेमाडपंथी अवशेष दिसतात. तेथील हेमाडपंथी अवशेष, लोहस्तंभ तसेच शिलालेखावरून असे लक्षात येते की, त्या जागी श्रीविष्णूचे मंदिर होते, जे आक्रमकांनी क्रुरतेने ध्वस्त केले. प्रत्येक श्रीविष्णू मंदिरासमोर एक गरुडस्तंभ असतो, ज्यावर गरुडमूर्ती विराजमान असते. तसेच मंदिराच्या छताला यक्ष आणि गंधर्वांनी आधार दिल्यासारखी स्तंभांची रचना असते.
अशाप्रकारची कितीतरी (१००० वर्षापेक्षा जास्त प्राचीन) मंदिरे महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत. मंदिर पाडले तरी मात्र लोहस्तंभ (गरुडस्तंभ) नष्ट करता आले नाही. लोहस्तंभावरील गरुडमूर्तीमात्र आक्रमकांनी पळवून नेली. लोहस्तंभ हे ७.२ मीटर उंचीचे असल्याने, इर्षेपोटी ७२ मीटर उंचीचे कुतुबमिनार बांधण्यात आले. मंदिर नष्ट केल्या गेले तरी मात्र हेमाडपंथी शैलीचे अवशेष, प्राचीन श्रीविष्णू मंदिराच्या अस्तित्वाची साक्ष देत उभे आहे. शिलालेख,हेमाडपंथी शैलीचे अवशेष आणि लोहस्तंभ (गरुडस्तंभ), निसर्ग आणि काळासोबत आजही अविरत झगडत उभे आहे. त्याच अवशेषांच्या ह्या फोटो आहेत.
प्राचीनवास्तू अभ्यासकांनी जाणीवपूर्वक तुलनात्मक अभ्यास करून सत्य जगासमोर आणावे. त्याच शैलीचे विदर्भात चिमूर येथे बालाजीमंदिर (श्रीविष्णू) अस्तित्वात आहे. अन्यही ठिकाणी अशीच रचना असलेली प्राचीन मंदिरे आहेत.
— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
Leave a Reply