जुन्या काळी सारा पारिवारिक गोतावळा पंचक्रोशीत विखुरलेला असायचा ,आजूबाजूच्या गावात असलेल्या कुणाकडे तरी कार्य-प्रसंग असायचे आणि त्यासाठी जाणे व्हायचे हे असे कार्यक्रम बारमाही चालू असायचे ,सकाळी जाऊन संध्याकाळी आपल्या घरी मुकामी वापस “अशा वेळेत जाऊन येणे होत असे.
अशा कार्यक्रमासाठी आवर्जून हजर राहायचे “ही पद्धत होती, रिवाज होता .त्यामुळे माणसे नित्य संपर्कात असायची , भेटीत एकमेकांची ख्याली खुशाली विचारली जायची .अशा भेटीत मानसिक आधार मिळत असे , पैश्याची श्रीमंती सरसकट नवह्ती पण मनाने श्रीमंत असलेली माणसे भवताली असायची..त्यांचा आधार फार मोलाचा असायचा . त्यांचे खुशालीचे चार शब्द मनाला उभारी देणारे असायचे ..
आपापसातील परिवारांना एकमेकांबद्दल आपुलकी ,सहानुभूती होती, याचा अर्थ त्यांच्यात मतभेद नव्हते असे नाही, हेवे-दावे, एकमेकांची उणी -दुणी काढणे ” या गोष्टी चालायच्या ,पण,अडचणीच्या वेळी ,संकट -समयी मनातले सारे विसरून, बाजूला ठेवून माणसे मदतीसाठी धावून येत असत , आपल्या माणसाला “खुशाल” पाहिले की मोठे समाधान मिळत असे ….
या अशा जुन्या काळात -ख्याली-खुशाली सांगणारे लोकप्रिय साधन होते ..पोस्ट-कार्ड “, त्याकाळी ,घरा -घरातील माणसं दूरवर राहणार्या आपल्या माणसाच्या ख्याली-खुशालीचा मजकूर लिहिलेले पत्र ” येण्याची आतुरतेने वाट पाहत असत , ४-८ दिवसांचा प्रवास करून ते पत्र हातात पडले की .घरातील हर एक व्यक्ती आपल्या स्वताच्या हातात ते कार्ड घेऊन ..डोळे भरून ..मन एकवटून ते चिमुकले पत्र वाचीत असे ..पण त्या पत्रात इतकी मोठी भावनिक सामर्थ्य असायचे की ..मरगळून गेलेले घर ..त्या पत्रातील ख्याली-खुशालीच्या बातमीने सावरले जात असे.
साधे -सुधे पोस्त कार्ड , आंतरदेशीय-पत्र आणि पाकिटे ” यातून एकमेकांना ख्याली-खुशाली “कळवली जात असे.
पोस्त कार्ड -पारिवारिक मास्ध्य्म ..घरातील वडीलधार्या व्यक्तींनी पत्रातील मजकूर वाचून सगळं खुशाल आहे बरं का ! असे भरल्या आवाजात सांगितले की ..भरलेले डोळे पदराने कोरडे करून मोठ्या समाधानाने ..घरातली बाई-माणसं पुन्हा कामाला लागत .
आंतरदेशीय पत्रात तसा सर्वसमावेशक मजकूर असे – सुरुवात बाबंना उद्देशून .थोडा आई साठी, -तिची काळजी कमी करणरा मजकूर , लहान भावंडांना मजा वाटेल असे काही सांगणारा मजकूर.आणि शेवटी सर्वांना नमस्कार असे.
बंद पाकीट ” मात्र .एकांतात वाचले जायचे .. इकडे सगळा खुशाल आहे ,काळजी करू नकोस , एकटेपणा लवकरच
संपेल “, प्रेमाचे -आधाराचे चार शब्द ” ,वाचून ..दुसरे दिवशी पुन्हा निरस असे जगणे सुरु होत असे .पण..मनात “ते खुशाल आहेत ना ! बस ! कालच्या पत्रातील मजकूर धीर देत असे.
एकमेकापासून दुराव्ल्यावारच माणसाला सहवासाची आणि प्रेमाची ,मायेची किंमत कळत असते ,दूरवर गेलेला माणूस शरीराने त्या गावी असायचा .पण त्याचे मन ,ते मात्र घरात आणि आपल्या माणसा भोवती घिरट्या घालीत असे , विरहाने प्रेमाचे धागे घट्ट विणले जातात ” हे खरे आहे….
पैसे खर्च न करता ज्या गोष्टी करता येतात ..त्यात .आपलेपणाची भावना निर्माण करणे” ही गोष्ट सर्वात अगोदर करावी , ही गुंतवणूक फार मोठी असते, बिकट प्रसंगी ..आपण केलेल्या मदतीची आठवण ठेवून मदतीस धावणारी माणसे अजून आहेत “, कृतघ्न तेवढी विसरावी आणि “, कृतज्ञ सदा स्मरावी.हे किती छान आहे.
आताच्या नव्या आधुनिक काळात माणसे भले ही प्रत्यक्षात भेटत नसतील ,पण नव्या तंत्रज्ञान-उपलब्धीमुळे मोबाईल हाती पडल्या पासून ..२४ तास आपण एकमेकांच्या सहवासात आलो आहोत ..महिनो न महिने साधा शब्द ही न बोलणारे , पत्र लिहून ख्याली-ख़ुशी कळवता येते हे विसरून जाणारे , एकाएकी ..दिवसभर बोलायचे सुरु झाले आणि हा अति-आपलेपणा ” सुद्धा नकोसा वाटावा असा झालाय . कारण ..नको इतक्या चौकश्या सुरु झाल्यात , नको तितकी लुडबुड सुरु झाली ..ही अशी जवळीक “नकोशी होऊन बसली आहे . बंद दर्वाजायातील जग,त्याच्यातील अनेक गोष्टी सार्वजनिक ठिकाणी चविष्टपणाने चर्चिल्या जातात की काय अशी भीती वाटावी अशी स्थिती झाली आहे.
ही ख्याली-खुशाली आहे ! असे कसे म्हणावे ? उलट ही तर एख्द्याच्या नाजूक गोष्टींना चव्हाट्यावर आणण्या सारखे आहे .
इंटरनेटवर एखाद्या बद्दल संभ्रम निर्माण करणारी पोस्त टाकून ..दिवसभर गोंधळ माजेल आणि यात विकृत आनंद मिळवणारी प्रवूत्ती पाहून ..मन व्यथित होऊन जाते ,
आजच्या अस्थिर वातवरणात एकमेकांना सांभाळून घेत ..रोजचे जगणे कसे सुसह्य होईल “याचा विचार करण्याचे ठरवले तर ..आपल्या माणसाला निश्चिंत मनाने राहता येण्यास मदत केल्या सारखे आहे.
यालाच ख्याली -खुशाली “विचारणे असे म्हटले तर ते अयोग्य ठरणार नाही.
— अरुण देशपांडे
पुणे
९८५०१७७३४२
Leave a Reply