मंडळी सप्रे म नमस्कार !
NETFLIX वर एक अप्रतिम सुंदर चित्रपट पाहिला.एका चित्रपटातून किती सुंदर शिकवण देता येऊ शकते याचं एक उत्कृष्ट उदाहरण !
समाजातील एका अनिष्ट प्रथेमुळे किती जणांचं आयुष्य पणाला लागू शकतं याची कल्पनाही आपण करु शकत नाही.आजही आपल्या देशात स्त्री ला किती दुय्यम वागणूक दिली जाते हे लक्षात येतं.वास्तवीकत: स्त्री ही पुरुषापेक्षा कैक लक्ष पटीने श्रेष्ठ आहे आणि संसार छान चालायला जितकी पुरुषाची तितकीच स्त्री ची भूमिकाही महत्वाची असते ! एखाद्या घरी पुरुष गेला तर त्याच्यापश्चात् स्त्री फारच क्वचित पुनर्विवाह करून पुढील आयुष्य जगते.बहुतांश वेळी स्त्री आपली अपत्य ( असल्यास ) आणि माणसांसह यांना स्वाभिमानाने उभं करते ! पण स्त्रीच्या पश्चात् पुरुष इतक्या धैर्याने उभा राहण्याची खूपच कमी उदाहरणं पहाण्यात येतात ( माझ्या पहाण्यात नात्यातीलच असे काही पुरुष आहेत पण अशी उदाहरणं अपवादात्मक ! )
संपूर्ण चित्रपटातील संवाद आणि दिग्दर्शन अप्रतिम आहेत ! दोन प्रसंगी डोळे भरून वाहू लागतात — एकदा चित्रपटाच्या मध्यावर आणि एकदा शेवटी….. मुलगी शिकली प्रगति झाली! हे अजूनही छापील वाक्य वाटावं अशीच परिस्थिती आहे देशामधे शहरे वगळता बर्याच ठिकाणी…..
सगळे अभिनेते नवीन , अनोळखी पण इतकी सुंदर कामं केली आहेत की दाद द्यावीशी वाटते.निर्माते किरण राव व आमीर खान ! दिग्दर्शिका किरण राव !
चित्रपटाचं नांव ला पता लेडीज् ! म्हणूनच लेखाचं शीर्षक आहे लाले दी जान !
चित्रपटाची कथा अजिबात न सांगता जेवढं लिहिता आलं तेवढं लिहिलंय , बाकी स्वत: अतिशय परफेक्शनीस्ट असलेल्या आमीर खाननं चित्रपट पण तितकाच सुंदर काढलाय आणि चित्रपटातून ठळक शिकवण दिली आहे ! चित्रपटात एक प्रसंग असा आहे ज्यात लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण! ही म्हण लक्षात येते ( अशी मस्त सणसणीत कानाखाली वाजवलीये किरण राव ने उत्कृष्ट दिग्दर्शनाची चुणूक दाखवत! ) तो प्रसंग तुमच्यासारखे चाणाक्ष लोक नक्की ओळखतील याची खात्री आहे !
कळावे ,
-उदय गंगाधर सप्रे म—ठाणे
शनिवार २६ एप्रिल २०२४ दु.३.०० वा.
Leave a Reply