२००५ सालच्या मुंबई फेस्टिव्हल साठी ६३ मुलांना घेऊन कौशल इनामदार यांनी मंगेश पाडगांवकरांनी लिहिलेली “तुझा सूर्य उगवे आम्ही प्रकाशात न्हातो” ही प्रार्थना सादर केली. याच प्रार्थनेने या सोहळ्याचा प्रारंभ झाला. ही आनंदाची गोष्ट आहे. दुःखाची बाब अशी की पुढच्या ३ तासांच्या सोहळ्यामध्ये नाना पाटेकर यांनी केलेले उत्स्फूर्त भाषण सोडले,तर मराठीचे एकही अक्षर उच्चारले गेले नाही.
ही वस्तुस्थिती आज आपल्याला सर्वत्र पाहावयास मिळते. महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र कुठे दिसत नाही. मुंबईच्या एकाही व्यावसायिक रेडियो वाहिनीवर एकही मराठी गाणं लागत नाही. आपल्या मातृभाषेत आपल्याला भाजीपाला विकत घेता येत नाही, आपल्या मातृभाषेत एका जागेवरून दुस-या जागी जाता येत नाही. आपल्याच राजधानीत मराठीला दुय्यम स्थान मिळतं ही खेदाची गोष्ट आहे.
प्रश्न फक्त मुंबईचाही नाही. मराठी लोकांमध्येच मराठीच्या बाबतीत एक औदासिन्य आहे की काय अशी शंका येत राहते. कौशल इनामदार यांना प्रामाणिकपणे वाटतं की एक चळवळ जनसामान्यांमधूनच जन्मली पाहिजे. अमराठी लोकांनी मराठीचा आदर बाळगण्याचा आग्रह धरण्याआधी मराठी लोकांमध्ये मराठीचा अभिमान रुजवायची गरज अधिक आहे.
मराठीला एका अभिमानगीताची गरज आहे.
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
सुरेश भटांच्या या शब्दांना कौशल श्री इनामदारने संगीत दिलं आहे.हे गीत प्रचंड मोठ्या प्रमाणात, म्हणजे १२० प्रस्थापीत गायक, ३५० समूहगायक आणि १०० वादक यांच्या ताफ्यात ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे. या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाला लागणारा खर्च खरं तर सहज एका प्रायोजकाकडून उपलब्ध होऊ शकला असता. पण तसं केलं तर ते एक व्यावसायिक ‘प्रॉडक्ट’ झाल असतं. जो मुळात या मागचा हेतू नव्हता. ही एक चळवळ आहे आणि त्याचं उगमस्थान जनसामान्यांतच असावं. म्हणून लोकवर्गणीच्या माध्यमातून, अर्थात १५०० लोकांनी उत्स्फुर्तपणे प्रत्येकी ५०० रुपये देऊन दिलेल्या प्रतिसादामधून याच्या ध्वनिमुद्रणाचा खर्च उभा राहिला आहे.
सहभागी गायकांची नावे
रवींद्र साठे, अश्विनी भिडे-देशपांडे,सुरेश वाडकर,पद्मश्री पद्मजा फेणाणी,आशा खाडिलकर,आरती अंकलीकर-टिकेकर, सत्यशील देशपांडे, श्रीधर फडके,साधना सरगम,शौनक अभिषेकी,संजीव चिम्मलगी,सावनी शेंडे-साठये,स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे,अवधूत गुप्ते,प्रसाद ओक, सुनील बर्वे,शैलेश दातार,सुमीत राघवन,मधुराणी प्रभुलकर,सीमा देशमुख, विठ्ठल उमप,देवकी पंडित,उत्तरा केळकर,रंजना जोगळेकर,महेश मुतालिक,अनिरुद्ध जोशी,अनघा पेंडसे, सलील कुलकर्णी,माधव भागवत,संगीता चितळे,अनुजा वर्तक,भाग्यश्री मुळे,सायली ओक,मधुरा कुंभार,आनंदी जोशी, अनघा ढोमसे,महालक्ष्मी अय्यर,शंकर महादेवन,मिलिंद इंगळे,कौशल श्री. इनामदार,वैशाली सामंत,अच्युत ठाकूर, उदेश उमप,आदेश उमप,संदेश उमप,नंदेश उमप,हम्सिका अय्यर,निहिरा जोशी,अजित परब,ऋषिकेश कामेरकर, योगिता पाठक,विभावरी आपटे-जोशी,मधुरा दातार,अमृता नातू,संजीवनी भेलांडे,मिलिंद जोशी,मनीषा जोशी, निलेश मोहरीर, योगिता चितळे,आनंद सावंत,मंदार आपटे,ऋषिकेश रानडे,जितेंद्र अभ्यंकर,अमोल बावडेकर, अभिजित राणे, नेहा राजपाल,शिल्पा पै,जान्हवी प्रभु-अरोरा, सोनाली कर्णिक, मिथिलेश पाटणकर, विनय राजवाडे, मनोज देसाई, मयुरेश पै,प्रशांत काळुंद्रेकर,त्यागराज खाडिलकर,मुग्धा वैशंपायन,कार्तिकी गायकवाड, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत,आर्या अंबेकर,वर्षा भावे,रवींद्र बिजूर,अजय गोगावले,अतुल गोगावले,हरिहरन,म्रुदुला दाढे-जोशी, राजा काळे, राम देशपांडे,स्वानंद किरकिरे,ओंकार दादरकर,माधुरी करमरकर,अमृता काळे,स्वप्नजा लेले,संदीप उबाळे, अशोक पत्की,कल्याणी पांडे.
भारतात निर्माण झालेलं सर्वात भव्य गीत. या गीताच्या निर्मितीतील सहभाग –
३ शहरं.
९ स्टुडियो.
१२ ध्वनिमुद्रक.
६५ वादक कलाकार.
११२ प्रस्थापित गायक.
३५० लोकांचं समूहगान.
९ स्टुडियो.
१२ ध्वनिमुद्रक.
६५ वादक कलाकार.
११२ प्रस्थापित गायक.
३५० लोकांचं समूहगान.
आणि २००० लोकांचा सकारात्मक सहभाग.
… आणि कविवर्य सुरेश भट यांच्या लेखणीतून उतरलेले अजरामर शब्द – ‘लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी!’
थोडक्यात – भारतात निर्माण झालेलं सर्वात भव्य गीत.
सुरेश भटांच्या या शब्दांना कौशल श्री इनामदारने संगीत दिलं आहे. हे गीत प्रचंड मोठ्या प्रमाणात, म्हणजे १२० प्रस्थापीत गायक, ३५० समूहगायक आणि १०० वादक यांच्या ताफ्यात ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे.
Leave a Reply