लेडिज बायकांचं शॉपिंग हा खरं तर फार गहन विषय आहे . आणि त्या विषयांचं शास्रीय अंगाने विस्लेषन झालं पाहीजे. म्हणजे मराठीत सांगायचं तर साईंटीफीक अॅनालिसिस झालं पाहिजे असं मला वाटतं.
आता या शॉपिंग चे पण दोन मूख्य प्रकार असतात. एक म्हणजे रोजचे वाणसामान म्हणजे आपलं ग्रोसरी शॉपिंग. आणि भाजीपाला ,आता यात कूठलीच एक्साईटमेंट किंवा थ्रिल नसलं , तरीपण यांची दुकानं फिक्स असतात. त्यातही परत तेल, साबण, पावडर यांची दूकानं वेगळी तर गहू तांदळाचं, डाळी याचं दूकान वेगळं असतं . खरं तर ही दुकानं फिक्स करण्या मागे खूप अभ्यास आणि खूप R &D केलेली असते तिच गोष्ट फळं आणि भाजीपाला याची पण असते. दुसरा आणि सर्वात एक्साईटींग कम थ्रीलिंग प्रकार म्हणजे कपडे आणि साड्या यांच्या शॉपिंग चा असतो.
बायकोने बनवलेल्या टेस्टी चिकन करी वर आडवा हात मारून ढेरीवर हात फिरवत आपण मस्त ताणून देवून रैवारची दूपार कारणी लावावी या विचारात आपण असतो तेंव्हाच या शॉपिंग चा मुहूर्त निघतो. अपण विचार करतो जाऊदे, येऊ तासाभरांत, झोपू आल्यावर तिथंच गडी फसतो. आता या शॉपिंग चे काही नियम असतात पहिला नियम म्हणजे पहिल्या दोन तिन दुकानांमधून काहीही खरेदी करायचं नाही गल्ली क्रिकेट मधे जशी ट्रायल ओव्हर असते किंवा विटीदांडूच्या खेळात जसा पहीला डाव देवाला असतो तसं पहिलं दूसरं दुकान देवाला सोडलेलं असतं.
मार्केट मधले रेट्स आणि ट्रेंड्स माहीत करून घेण्यासाठी आणि सेल ऑफर करणार्यांचे खरे भाव समजून घेण्यासाठी फक्त या दुकानांत एक चक्कर टाकलेली असते खरा डाव त्यानंतर चालू होतो कसलेला बूध्धीबळपटू जसा सलामीलाच समोरच्या खेळाडूंचं जजमेंट घेतो तसं गिर्हाईक आणि दुकानदार एकमेकांना जज करत असतात बायको सूरवातीचे दहाबारा ड्रेस फक्त नजरेनेच रिजेक्ट करते त्यानंतर आलेल्या मालापैकी एक दोन ड्रेसेस ला हात लाऊन पहाते या स्टेज पर्यंत जर दूकानदार सिरिअसली माल दाखवत असेल तर इथं बघायचं नाहीतर नवीन दूकान गाठायचं असा काहीसा प्लान असतो दुकानदार पण हूशार असतो तो पण यानंतरच खास ठेवणीतला माल दाखवतो अर्धेअधिक दूकान पाहून झाल्यावर पाच सहा ड्रेस ट्राय करण्यासाठी बाजूला काढले जातात ..आणि त्यातले दोन फारकाही आवडले नाहीयेत असं दाखवत सिलेक्ट केले जातात आणि घरी गेल्यावर नाही आवडले तर बदलून मिळतील या बोलीवर खरेदी केले जातात साड्यांची खरेदी ही यापेक्षा लै वरच्या लेव्हल ची गोष्ट असते येथे पाहिजे जातीचे येऱ्यागबाळ्याचे काम नोहे इथला थाट काही वेगळाच असतो कमीतकमी दोन हजार Sqft चा एक असे चारपाच फ्लोअर असतात मऊमऊ गद्या त्यावर पांढरंशुभ्र चादरी, लोड, फूल AC ओक्के मधे असतं सगळं शिफॉन, कांजीवरम ,बनारसी सिल्क, गढवाली, पटोला, कशिदाकारी ,चीकनकरी (खायची नाही ती वेगळी असते) ….. अबबब कायकाय ते प्रकार आणि मोरपंखी, अबोली, राणीकलर,किरमिजी नूसती नावं ऐकून आपल्याला कलर समजत नाही त्यामुळं आपल्याला कलरब्लाईंडनेस आला की काय अशी शंका येते (तसही 42 चा शर्ट आणि 36 ची प्यांट विकत घेणार्याच्या डोक्याबाहेरचा विषच असतो तो)
साड्यांची सगळी शॉपिंग ये कलर* *मे* *दुसरा* *डिझाइन* आणि *इस* *डिझाइन* *मे* *दूसरा* *कलर* या भोवती फिरत रहाते समोर पडलेल्या मोठ्ठया ढिगातून एक साडी सिलेक्ट केली जाते जी मोस्टली पहिल्या पाचांपैकीच असते
किंमतीचा विषय येतो दुकानदाराने पाच हजार सांगितले कि या दोन हजारापासून सूरवात करतात आता सौदा फिसकटला तर दुसर्या दुकानात परत तास दिडतास मोडनार त्यामुळं डिल फायनल होईपर्यंतच नवरोबांचा जिव टांगणीला लागतो
आता पहिल्या पाचांपैकी एक साडी पसंत पडल्यावर पण येवढा टाईमपास फक्त दुकानदाराचा कॉन्फीडंस कमी करण्यासाठी करायचा असतो जो बार्गेनिंग करतांना कामी येतो *’शास्र असतं ते’ !*
तासाभरांत परत येऊ असं वाटत असतांना चांगले पाच तास होऊन गेलेले असतात ……….
असो .
येवढं हार्ड बार्गेनिंग करणार्या या बायकोचं कौतुक वाटतं जेंव्हा ती एखाद्या गजरे विकणार्या शाळकरी मूलीकडून गजरे विकत घेतांना दहा विस रूपये जास्तच देते रस्त्यावर बसलेल्या एखाद्या आजीकडून गरज नसतांना काहीबाही वस्तू विकत घेते हायवेला भाजीपाला विकणार्या शेतकर्याकडून आठवणीने काहीतरी खरेदी करते त्यावेळी अजिबात मोलभाव करत नाही भले कितीही डिस्काउंट मिळू दे शॉपिंग ची ही खरी मजा मॉल मधे ट्रॉली भरून खरेदी करण्यांत किंवा ऑनलाइन खरेदीमध्ये कधिही येत नसतो आपलाच
डॉ. समिर भावसार
डोंबिवली
आम्ही साहित्यिक वरील लेखक
Leave a Reply