वा झुरळा,
खबरदार जर पंख फुलवोनी जाशील पुढे,
मुडदा पाडीन तुझा गधड्या
हा मी मर्द मराठ्याचा वंशज असे
म्यान न करातले का तुला हे दिसे
दचकलो पाहून तुला मी न कीटका
मारुनच तुला मी टाकीन उसासे ॥
क्षुद्रा जरी चावला होतास मला,
तरी शूर वीर मी न तुला चावलो
धर्मयुद्ध खेळीन शर्थीचे मी
हा पहा तलवार आणण्या चाललो ॥
असेल रंग तुझ्यासारखा तिचा
पण गंजली म्हणून म्हणू नको
भ्यायलो तुला मी, समजून
विकट असा हासू नको ॥
-यतीन सामंत
Leave a Reply