नवीन लेखन...

‘लघु’ जीवन !

आत्ता आत्ता पर्यंत चार अंकी नाटकं (गारंबीचा बापू) पाहिली, पहाटे दोनपर्यंत सांगलीतील भावे नाट्यगृहात पंडित हृदयनाथ मंगेशकरांना घड्याळाची पर्वा न करता मनःपूत फर्माईशी केल्या. जळगावच्या बालगंधर्वाच्या ओट्यावर (खुले नाट्यगृह) १९६९ साली वसंतरावांचे “कट्यार ” पाहिले, पहाटे तीन पर्यंत जागून ( वन्समोअरची रसिकांनी केलेली इतकी बरसात नंतर कधी पाहण्यात आली नाही).

” संगम” , ” मुघले -इ -आजम ” आणि अगदी अलीकडचे ” लगान ” /”स्वदेस ” तीन तास ओलांडून गेले तरी कधी हुं की चूं केलं नाही. पूर्ण लांबीच्या “मेरा नाम जोकर ” च्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करीत राहिलो पण ती लंबीचौडी प्रेमकहाणी मन लावून जगलो.

बघता बघता आपले करमणुकीचे जग आक्रसत गेले. चित्रपटाची लांबी खुपायला लागली. दोन तासांपेक्षा जास्त वेळ चित्रपटगृहात बसणे म्हणजे वेस्ट ऑफ टाइम वाटू लागले. नाटके कापून “दोन अंकी” फ्लेवर मध्ये सर्व्ह व्हायला लागली. पुढे जाऊन दीर्घांक ( मध्यंतर विरहित सलग नाट्यानुभव देणारे) सादर व्हायला लागले. टीव्हीवरील मालिका २० मिनिटांमध्ये करमणुकीचा समर्थ डोस देऊ लागल्या.

कादंबरीची कथा आणि नंतर “अलक ” ( अति लघु कथा ) झाली. महाकाव्यांच्या “चारोळ्या ” झाल्या. सगळीकडे हात आखडता घेतला जातोय. थोडक्यात आवरायचे- अनावश्यक फाफटपसारा नको.

वेळेशी युद्ध सुरु झालं, अग्रक्रमांशी हातघाई सुरु झाली तसतसा जीवनपट छोटा आणि व्यक्तिगत होत चालला आहे. ” नॅनो ” फक्त वाहन राहीले नसून जीवनविषयक तत्वज्ञान होत चाललं आहे. सगळीकडे शॉर्टकट ! भलीमोठी पोस्ट लिहिण्याऐवजी मायक्रो ब्लॉगिंग.

कोरोना मुळे नव चित्रपट निर्मिती बऱ्यापैकी कमी झाल्याने वर्तमानपत्रातील समीक्षकांची पंचाईत झाली आहे. म्हणून आजकाल त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये गाजलेल्या लघुपटांवर लेखन सुरु केले आहे. ७-८ मिनिटांपासून ४०-५५ मिनिटांचे इतके सुंदर लघुपट आहेत, हेच मला आता कळले. To the point आणि no बकवास ! योग्य परिणाम साधून संपणारे, एखाद्याच मुद्द्यावर भाष्य करणारे !

पण त्याचवेळी ९-१० एपिसोड्स आणि असे दोन-चार सीझन्स असणाऱ्या वेब -सीरीजही जोमात सुरु आहेत. प्रेक्षक बींच वॉचिंग मध्ये रमले आहेत.
एका बाजूला आखूड होत चाललेले मनोरंजनाचे आयाम, दुसरीकडे खूप पसरटही होताना दिसताहेत.
गोंधळायला झालंय !

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..