लाजेची कल्पना कालसापेक्ष असते. म्हणजे वेगवेगळ्या काळात ती वेगवेगळी असते. अजंठा-वेरूळ अथवा खजुराहो येथील शिल्प पाहीली असता, शिल्पातील स्त्रीया बऱ्याचश्या नग्न अथवा अर्ध-नग्नानस्थेत दिसतात. ‘टाॅपलेस’ असणं किंवा उरोभाग अनावृत्त असणं ही त्यातील बहुसंख्य शिल्पांत समानता आहे. कोणत्याही काळातली समाजाचे प्रतिबिंब त्या त्या काळातील लेखन-चित्र-शिल्पकलेत लख्खपणे पडलेलं दिसतं. कलाकार समाजातूनच येत असल्याने त्या त्या काळातील प्रचलित इष्ट-अनिष्ट प्रथांचा त्याच्या मनावर परिणाम होतो व तेच त्याच्या कलाकृतीत प्रतिबिंबित होतं. प्राचिन शिल्पांमधे असं नग्न/अर्धनग्नावस्थेत असलेल्या स्त्रीयांची शिल्प, त्या काळात लाजेची कल्पना शरीराच्या अनावृत्तपणाशी नसावी असा सारांश काढायला भाग पाडते. उरोभागच कशाला, या शिल्पांत मैथुन दृष्य अगदी स्पष्ट आणि समुहातून दिसतात. याचा अर्थ नग्नता वा मैथुन हा नैसर्गीक भाग आहे आणि त्यात लाजण्यासारखं काहीच नाही अशी कल्पना त्या शिल्पकाळातील समाजात असावी. त्या काळात खोटं व अन्यायाने वागणं हा लज्जेचा भाग असावा कदाचित.
पूर्ण वाचण्यासाठी क्लिक करा.
https://www.facebook.com/nitin.salunke.1297/posts/1353873928000794
Leave a Reply