साडी चोळी सुंदर नेसूनी आभूषणें ती अंगावरती
लज्जा सारी झांकुनी टाकतां तेज दिसे चेहऱ्यावरती ।।१।।
आत्म्यासम ती लज्जा भासे सौंदर्य जिवंत त्याच मुळें
लोप पावतां लज्जा माग ती जिवंतपणा तो कसा कळे ।।२।।
लपले असते सौंदर्य सारे एक बिंदुच्या केंद्रस्थानीं
शोध घेण्या त्याच बिंदूचा लक्ष्य घालतां उघडे करुनी ।।३।।
विकृत ती मनाची वृत्ति स्वच्छंदीपणात ती असते
क्षणिक पणाच्या मागें लागून खरा आनंद ती गमावते ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply