पूर्वी वडिलांच्या अंगावरील जुने कपडे पाहून, मी त्यांना कित्येकदा “ओरडलो” असेल कि, नवीन कपडे शिवून घ्या, फाटेपर्यंत घालायचे असतात का ?
पण ते “हो” म्हणून वेळ मारून नेत असतं…
तसा दिवाळीचा आणि आपला काही संबंध नाही पण, “स्त्रीहट्ट” आणि “बालहट्ट” सांभाळून घेताना, कोणाला कपडे, कोणाला मोबाईल… वगैरे वगैरे अशी खूप मोठी प्लांनिग केली, अचानक लक्षात आले “स्वत:साठी” काहीच ठरवले नाही…. तोच समोर “वडिलांचा चेहरा” समोर आला, वडील तेव्हा का जुने कपडे घालत असतं, ते कळून चुकले,
मात्र… मी स्वत “वडील” झाल्यावर…. कपड्याने दरिद्री दिसणारे वडील… पैश्याने मोजता येणार नाही असे “धनवान” असतात…
कुटुंबाच्या सुखातच स्वतचे सुख शोधतात…
आदर असतोच, पण…. आणखीच वाढला… अन… न कळत डोळ्याची किनार पाणावली….
बापाची चप्पल आपल्या पायात आली कि, आपण कधी वडिलांना लक्षात घेतंच नाही… कित्येकदा उद्धटासारखेहि वागतो…
पण आपण “लक्षात न घेतलेला बाप”… लक्षात येतो… मात्र आपण स्वत आई किंवा बाप झाल्यावरच…
Leave a Reply