नवीन लेखन...

लॅपटॉप

लॅपटॉप याचा अर्थच मुळी मांडीवर ठेवता येईल, एवढ्या आकाराचा संगणक असा आहे. डेस्क टॉप संगणकही जास्त जागा व्यापतात व ते प्रवासात किंवा बाहेर वापरता येत नाहीत, त्यामुळे पोर्टेबल संगणकाची ही कल्पना पुढे आली.

लॅपटॉपला नोटबुक पीसी असेही म्हटले जाते. एसी अॅडॉप्टर व बॅटरी यांच्या मदतीने त्याला वीजपुरवठा केला जातो. मदरबोर्ड, व्हिडिओ कार्ड, हार्ड ड्राइव्ह, डिस्प्ले, कीबोर्ड, टचपॅड हे त्याचे प्रमुख भाग असतात. यात डेस्क टॉपप्रमाणे सीपीयू असतो, पण या संगणकाची रचना अतिशय कमी जागेत करायची असल्याने अंतर्गत रचनेत मात्र खूपच फरक असतो.

बॅटरीवर लॅपटॉप तीन ते पाच तास विनासायास चालू शकतो. डेस्क टॉप कॉम्प्युटरनंतर १९६८ च्या सुमारास झेरॉक्स पार्कमध्ये काम करणारे अॅलन के यांनी अशा पोर्टेबल संगणकाची कल्पना प्रथम मांडली. त्यावर एक शोधनिबंधही त्या वेळी सादर करण्यात आला होता. १९७३ मध्ये आयबीएमने स्पेशल कॉम्प्युटर एपीएल मशिन हा स्कॅम्प नावाचा प्रकल्प आखला व त्यात अशा प्रकारचा संगणक तयार करण्याचा हेतू होता. त्याच सुमारास आयबीएम ५१०० हा कुठेही नेता येईल, असा संगणक व्यावसायिक हेतूने बाजारात आणला गेला. १९८१ मध्ये ओसबोर्न-१ हा अवघा १०.७ किलो वजनाचा पोर्टेबल संगणक तयार करण्यात आला.

खऱ्या अर्थाने ज्याला आजच्या स्वरूपातील लॅपटॉप म्हणता येईल तो १९८३ मध्ये तयार करण्यात आला, त्याचे नाव गॅव्हिलन एससी असे होते. लॅपटॉप हा वजनाला हलका म्हणजे पाच पौंडापर्यंत असतो. त्याच्या स्क्रीनची जाडी तीन इंचापर्यंत असते. त्याचे तीन फायदे आहेत. लॅपटॉप हा तुलनेने कमी उष्णता निर्माण करतो, अतिशय कमी जागेत मावतो, वीजही वाचवतो, तो कुठेही नेता येतो. डॉकिंग स्टेशनच्या मदतीने त्याचे रूपांतर डेस्क टॉप पीसीमध्ये करता येते.

पीसी कार्ड त्यात असते, त्यामुळे मोडेम व नेटवर्कचा प्रश्न सुटतो. लॅपटॉपला नोटबुक पीसी म्हटले जात असले तरी त्याचा उपयोग केवळ टायपिंग करण्यासाठी होतो. असा नाही. त्यावर अनेक सुविधा घेता येतात. इंटरनेटही पाहता येते. डीव्हीडी, सीडी बघता येतात. सध्या आयबीएम, अॅपल, कॉम्पॅक, डेल, तोशिबा अशा अनेक कंपन्यांचे लॅपटॉप बाजारात आहेत, त्यांच्या किमती अजूनही सामान्यांच्या आवाक्यात नाहीत, पण त्या कमी होत आहेत एवढे मात्र नक्की! लॅपटॉपची बाजारपेठ वाढते आहे, पण नेहमीच्या डेस्क टॉप कॉम्प्युटरची मागणी कमी होत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..