लपुनी कर्ण ऐकुनी जातो
अर्धेच सत्य जाणुनी रहातो
शब्द केवळ पडती कानी
मनास कोण ओळखून घेतो
केवळ मला नाही काही
म्हणूनी समोरचा दुष्ट नाही
व्यथा वेगळीच त्याची काही
कसे जाणावे….
अर्थ–
लपुनी कर्ण ऐकुनी जातो
अर्धेच सत्य जाणुनी रहातो
शब्द केवळ पडती कानी
मनास कोण ओळखून घेतो
(दुसऱ्याचे काहीतरी ऐकले आणि तिसऱ्यास सांगितले याने काय साध्य होते? केवळ गैरसमज. आपण ऐकीव गोष्टी सांगतो पण त्या खरंच तशाच आहेत का हे पडताळून पाहणे गरजेचे नाही? कोर्टाला सुद्धा पुरावे लागतात मग त्यासाठी पुरलेल्या अनेक गोष्टी, आठवणी बाहेर निघाल्या तरी काही फरक पडत नाही पण केवळ कानगोष्टी म्हणजे सत्य आणि तेच मानून जगणे याला शुद्ध मूर्खपणा म्हणतात. भावना कोण लक्षात घेतो, शब्द केवळ।ऐकले जातात पण त्यामागचं दुःख, सुखं, आनंद, राग याला काही अर्थ असतोच पण तोच नेमका डोळ्याआड केला जातो आणि मग सुरू होतात निरर्थक कानगोष्टी.)
केवळ मला नाही काही
म्हणूनी समोरचा दुष्ट नाही
व्यथा वेगळीच त्याची काही
कसे जाणावे….
(मला जे मिळायला हवं ते मिळत नाही ते दुसरा किंवा समोरची व्यक्ती देत नाही किंवा तसे घडत नाही म्हणचे तो चुकीचा असं समजून घेणं आणि तसाच मनात ग्रह करून त्याची लायकी काढणं चुकीचं आहे. मित्राचा फोन आला नाही बऱ्याच दिवसात, काम असलं की लगेच माझी आठवण येते वगैरे विचार मनात येतात आणि मग तिथे द्वेष निर्माण होतो पण आपण त्याला स्वतःहून पुसत नाही की काय झालं? बऱ्याच दिवसात काही संपर्क नाही, सगळं ठीक आहे ना? पण नाही तिथे रुजलेला मी पणा फणा काढून बाहेर येतो. थोडं एक पाउल आपणही पुढे टाकलं तर कदाचित दुराग्रह किंवा द्वेष निर्माण होणं टळू शकेल.)
— सुमंत परचुरे.
Leave a Reply