लाटांचा न्यारा स्वभाव ,उंच उंच उचंबळती,
खडी एक भिंत बनवत,
सागरात उभ्या राहती,
थेंबांची नक्षी हालती,
पुढेमागे होती मोती,–!!!
पुन्हा पुन्हा खेळत खेळत ,
मजेत धुंदीतनाचत– नाचत, एकमेकींवर आदळत आपटत,
किती संख्येने उभ्या राहती,–!!!
सागर मात्र शांत राही,
लेकींचा आपल्या खेळ पाही त्याचीच मजा लुटत लुटत,
कसा काय तटस्थ राही,–!!!
शांतता धीरगंभीरता,
आणतो तरी कुठून एवढी,
इतकी मोठी स्थितप्रज्ञता,
राखून असतो कशी केवढी,–!!!
पाण्याचे असीम प्रवाह,
सारखे जाती पुढेमागे,
तरीही एवढा मोठा सागर, धरणीशी आपले नाते सांगे,–!!!
निसर्गातील प्रत्येक घटक,
पाय जमिनीवर ठेवे,
जात-पात ठाऊक नाही,
न कुठले हेवेदावे,–!!!
कुठली नसतेच अहंता,—
न कसला दुराभिमान,
घटक कुठलाही असो,
कर्तव्याचेच दिसते भान,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply