रोज लाखो गुन्हेगारांना सुतासारखे सरळ करणा-या पोलिस दादांसाठी ही एक छोटी कविता… रोज स्वत: मरत असताना अगदी कमी खर्चात घर चालवणा-या पोलिसांना अर्पण केलेली ही कविता…
लाठीवरचं जगणं आता मुश्किल झालं आहे.
खून, दंगेफसाद, मर्डर आमच्या पाचवीला पूजलं आहे
पण लाठीवरचं जगणं आता मुश्किल झालं आहे.
नशीबानं मिळते म्हणतात सरकारी नोकरी
पण असून सरकारी नोकरी आम्ही सदैव भिकारी
करतो सरकारची चाकरी, पण मिळेना भाकरी
म्हणून मिंदे होतो कधी, तर कधी करतो गुलामगिरी
या गुलामीला कुठे तरी शह द्यायचा आहे
अन् लाठीवरचं जगणं मुश्किल झालं आहे.
खाकी वर्दीतले चोर, आम्हां म्हणती पोरं- सोरं
पत्नी झुरते घरापाशी, लागे तिच्या जीवाला घोर
सण उत्सव आमच्यासाठी फक्त कॅलेडवर असतात
आम्हाला मात्र तेवढ्याच पगारात सण साजरे करायचे असतात.
डोळे असून कधी अंध व्हावे लागते, कायदा असून हातात कधी शरमिंदे व्हावे लागते
या शरमिंदीगिरीचा नायनाट करणं आता सोपं झालं आहे
पणं लाठीवरचं जगणं आता मुश्किल झालं आहे.
कधी बंद तरी कधी कर्फ्यू, कधी लाठीमार तर कधी हाणामार
आम्हालाही हे करणं लज्जेचं वाटत आहे
कारण मारणारे ही आम्हीच आणि सरकारचे जोडे खाणारे ही आम्हीच
कारण गुंडावर सत्ताकारण्यांचा वरद हस्ताचा आशिर्वाद आहे
पण वर्दीतल्या व्यक्तीसाठी दोन शब्द बोलणं आता महाग झालं आहे.
अन् लाठीवरचं जगणं आता मुश्किल झालं आहे
पोरा बाळासाठी करतो नोकरी, नोकरीची पण गरज नाही
कारण वर्दी असून अंगावर, समाजात आमची इज्जत नाही
रात्र रात्र भर डोळ्याला डोळा नाही, आणि सरेआम फिरणा-या गुंडावर सरकारकडे टाळा नाही.
बंद कोठडीतले आयुष्य झाले आहे आमचे, कारणं पोलीस स्टेशनमध्ये ही फार चालते चोरांचे.
या वर्दीतल्या चोरांना नागवं करून मारायचे आहे.
अन् लाठीवरचं जगणं आता मुश्किल झालं आहे.
कधी सण उत्सवात थिरकावसं वाटतं, कधी संस्कृतीचा झेंडा घेऊन आपलं आयुष्य जगावंसं वाटतं
पण आम्हाला आमचं आयुष्य नाहीच कारण ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या दोनच शब्दात आमच्या आयुष्याचे सारं आहे
वर्दी मिळवून काही तरी देशासाठी करेन असं वाटले होत
तुंटपुंज्या पगारात कसंबसं घर चालते आहे. मग मी देशासाठी कधी वेळ देणार
चार हजारांच्या पगारात आमची चूल कशी पेटणार, कधी माझ्या डोक्यावरचा कर्जांचा भार हलका होणार
म्हणून इज्जत नसलेले लाचारी जगणंचं आता आमचा सन्मान झाला आहे
पण लाठीवरचं जगणं आता मुश्किल झालं आहे.
– अमोल उंबरकर
Leave a Reply