‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा–वैविध्य व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर….
विभाग – ७
कांहीं निष्कर्ष :
- थोडक्यात काय, तर –
- Creative activity / field मध्ये, प्रतिभा आणि तिचा वैविध्यपूर्ण वापर हें दोन्ही त्या व्यक्तीला महान बनवतात.
इथें आपण शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाचें उदाहरण घेतलें आहे. अन्य प्रकारच्या creative activities बद्दल सुद्धा तेंच म्हणतां येईल.
- काव्य रचना, किंवा अन्य साहित्यप्रकाराची रचना, हीसुद्धा basically creative activity च आहे. म्हणून, काव्यादी प्रकारांच्या रचनाकाराबद्दलही तेंच म्हणतां येतें. अशा रचनाकाराला, presentation method & style ; ती रचना गाइली जाणार असेल तर, गायनप्रकार, गायक ; इत्यादी बाबींचाही विचार करावा लागतो, व त्याप्रमाणें त्याच्या रचनांच्या भाषेमध्ये, स्टाइल् मध्ये, शब्दाच्या चयनामध्ये फरक होतो. गायनाबरोबर नृत्यही होणार असेल तर, त्याचाही विचार त्याला करावा लागतो.
( वारकरीमंडळी अभंग व भजन गायनाबरोबर नृत्यही करतात. कीर्तनकारही कीर्तनात, गायनाबरोबर थोडें नृत्यही करतात. कथक वगैरे नृत्यप्रकारांच्या समवेत तर गायन असतेंच ) .
म्हणजे, काव्यादी रचनाकाराच्या बाबतीतही, प्रतिभा व तिचा वैविध्यपूर्ण उपयोग, हें दोन्ही त्याला great बनवतात.
– सुभाष स. नाईक
Subhash S. Naik
M – 9869002126 .
eMail : vistainfin@yahoo.co.in
– – –
LATTERATEUR DNYANESHWAR AND LINGUAL-VARIETY –Part – 7