नवीन लेखन...

संगीतकार एल.पी उर्फ लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडतील लक्ष्मीकांत

लक्ष्मीकांत यांचे पूर्ण नाव लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर. त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९३७ रोजी झाला.
मुंबईच्या झोपडपट्टीत खाण्या-पिण्याची भ्रांत असलेल्या एका कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अशातच कधीतरी ते मेंडोलीन वाजवायला शिकले. खरंतर मेंडोलीन वादनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांना घेता आलं नाही. तरीही केवळ मेहनतीने आणि अंगभुत हुशारीने ते लवकरच त्यात पारंगत झाले. अशाच एका कार्यक्रमात लहानपणीच त्यांनी लता दिदींना साथ केली. त्यावेळी या छोट्या मुलाची कर्तबगारी आणि वादनातील कौशल्य याने लता दिदी भारावून गेल्या आणि त्यांनी त्यांना मदत करायचे ठरवले. लता दिदींनी लक्ष्मीकांतजींना “सुरील कला केंद्र” या लहान मुलांना संगीतशिक्षण देणार्या. संस्थेत पाठवले. तिथेच त्यांची भेट प्यारेलालजींशी झाली. वडील मशहूर ट्रंपेटवादक असले तरी का कोण जाणे, त्यांनी या कलेचा वारसा प्यारेलालजींना दिला नाही. अर्थात त्याने काही फरक पडला नाही. प्यारेलालजी व्हायोलीन वाजवायला शिकले. मा.लक्ष्मीकांत हे अत्यंत मृदूभाषी, लाघवी स्वभावासाठी प्रसिद्ध होते. त्यांचे आडनाव कुडाळकर च्या ऐवजी “गोडबोले” शोभलं असतं असं गमतीने म्हटलं जायचं. गरीबीतून वर आले असल्याने शेवटपर्यंत त्यांचे पाय जमीनीवरच होते. संगीत देणे हे त्यांनी व्यवसाय म्हणून स्विकारले होते आणि शेवटपर्यंत या व्यवसायाशी ते ईमानदार राहीले. एक यशस्वी व्यावसायिक ज्या व्यावसायिक क्लूप्त्या वापरतो त्या सर्व त्यांनी बेधडक पणे वापरल्या. मा.लक्ष्मीकांतजी बोलघेवडे तर मा.प्यारेलालजी मितभाषी. यशाचे एकाहून एक टप्पे पार करत असतानाही फिल्मी पार्ट्या, पेज थ्री कल्चर यात हे दोघेही रमले नाहीत. आलेलं कुठलंही काम – मग भलेही तो चित्रपट बी किंवा सी ग्रेडचा असो, सामाजिक असो की मायथालॉजीकल – नाकारायचा नाही हे त्यांनी ठरवूनच टाकलं होतं. १९६३ च्या पारसमणी च्या ८ वर्षे आधी त्यांनी एका चित्रपटाला संगीत दिलं होतं. पण तो चित्रपट डब्यात गेला.

१९४८ च्या “जिद्दी” पासून १९६३ पर्यंत या दोघांनी त्याकाळातल्या फक्त ओ.पी. नय्यर आणि शंकर-जयकिशन वगळता सर्व संगीतकारांकडे कधी नुसते वादक (मेंडोलीन आणि व्हायोलीन) तर कधी संयोजक म्हणून काम केले. “दोस्ती” चित्रपटासाठी एल.पी. ना त्यांचे पहिले-वहीले फिल्मफेअर अवॉर्ड जाहीर झाले ही बातमी द्यायला स्वतः सी. रामचंद्र त्यांच्या घरी गेले होते. आपल्या ड्रेसींग सेन्स साठी प्रसिद्ध असलेल्या चितळकरांनी या समारंभाला हजर राहण्यासाठी त्यांच्या आवडत्या टेलरकडून या दोघांसाठी सुट शिववून घेतला होता. मैत्रीची, स्नेहाची ही अशी उदाहरणे मा.लक्ष्मीकांतजींच्या आयुष्यात जागोजागी सापडतील. आणि अर्थात हा “गिव्ह अँड टेक” मामला असल्याने एल.पी. नी ही केलेल्या सहकार्याचीही उदाहरणे मिळतील. आपल्या जुन्या वादक सहकार्यां ना फ्री लान्सींगच्या जमान्यातही टिकवून ठेवणे त्यांना बरोबर जमत असे. लाला पाठारी आणि अब्दूल करीम हे दोघे ढोलकपटू म्हणजे एल.पीं.च्या संगीताचा ट्रेडमार्क.

पं. हरीप्रसाद चौरसीया यांची आणि मा.लक्ष्मीकांत यांची दोस्ती देखील अशीच स्ट्रगलींग च्या काळातली आणि अखेर पर्यंत टिकलेली होती. आजही हिरो मधली ती बासरी, कर्जमधली गिटारची धून, दोस्तीमधले माउथ ऑर्गनचे पीस कुठेही ऐकले तरी मान आपोआप डोलायला लागते. या इडस्ट्रीत आपल्या ३५ वर्षाच्या कारकिर्दीत, त्यांनी ६३५ चित्रपटाना, ३५०० च्या वर गाण्याना त्यांनी संगीत दिले. व सात फिल्मफेअर अवॉर्ड मिळवली. लक्ष्मीकांत यांचे २५ मे १९९८ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची गाणी

https://www.youtube.com/watch?v=P2YbrGEhtQc

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..