नवीन लेखन...

‘लर्न अॅण्ड अर्न ब्लॅक मनी’

कावळा काळा असतो. कोळसा काळा असतो, पण पैसा काळा असतो,

हे जेव्हा मी पहिल्यांदा ऐकले तेव्हा मला एकदम धक्काच बसला. लहानपणापासून आजतागायत मी कधी काळ्या रंगाचे नाणे किंवा नोट बघितलेली नाही. आम्हाला पांढरा पैसा बघायची, मिळवायची आणि खर्चायची सवय. तयामुळे काळ्या पैषांविषयी जसजशा बातम्या येऊ लागल्या तसतसा मी घाबरायला लागलो. म्हटले, आता काही आपले खरे नाही. सगळा पांढरा पैसा चलनातून बाद होणार अशा अफवा पसरू लागल्या. आमचे पांढरे टेन्शन वाढू लागले. करायचे काय च्यायला! चेहरा पांढराफटक पडायला लागला, तर लोक म्हणायला लागले की, हल्ली तू उजळ दिसायला लागलायस…’

मग मी बुक स्टॉलवर गेलो. विचारले, तुमच्याकडे ते ‘हमखास काळा पैसा मिळवण्याचे 100 मार्ग’ नावाचे पुस्तक आहे का हो?’ तर स्टॉलवाला म्हणाला, ‘आहे. एकच कॉपी शिल्लक उरलीय. माझ्या मुलीला मेडिकलला अॅडमिशन मिळवून द्या. पुस्तक देतो’ त्याचा नाद सोडून मी काळा पैसा मिळवण्याचे शिक्षण देणारा एखादा शॉर्ट टर्म कोर्स आहे का म्हणून चौकशी करायला लागलो, तर ‘लन अॅण्ड अर्न ब्लॅक मनी’ असा एक कोर्स असतो, असे कळले. गेलो संचालकाकडे. तो म्हणाला, ‘साडेबारा मिनिटांचा कोर्स आहे आमचा. ‘लिम्का’मध्ये रेकार्ड झालाय. मात्र, स्वीस बँकेत तुमचे अकाऊंट असेल तरच आम्ही तुमच्याकडून कोर्स फी स्वीकारू शकतो.’ म्हटले, ‘राष्ट्रीयकृत बँकेचा चेक नाही का चालणार?’ त्यावर तो एखाद्या पक्षाचा कार्यप्रमुख असल्यासारखा हसला आणि एखादा मंत्री असल्यासारखा खिदळलाआणि एखादा कॉर्पोरेट कंपनीमालक असल्यासारखा. चेकाळून म्हणाला, ‘आधी एकदा आरशात तोंड बघून ये स्वत:चे.’

— डॉ. महेश केळुसकर

(अनघा प्रकाशनच्या खिरमट या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च 2017 मध्ये प्रकाशित झाले.)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..