नवीन लेखन...

४२ नंबरचे लेजर

स्टेट बँकेत 1984 साली नगर जिल्ह्याचा श्रीरामपूर शाखेत कॅश ऑफिसर म्हणून माझी बदली झाली. शाखा बऱ्यापैकी मोठी, जवळपास सहा-सात साखर कारखाने असलेली ही शाखा. अर्थातच कॅशचे व्यवहार मुबलक प्रमाणात व्हायचे. त्यातून त्या वेळेस चिल्लरची (अगदी 10-20 पैशापासून 1 रुपयापर्यंत) कमतरता खूप जाणवायची. एकदा बऱ्याच मोठ्या रकमेची चिल्लर आम्हाला आरबीआय मिंटकडून आली. लगेचच त्याचे वाटप सुरू झाले. शहरातील  बऱ्याच व्यापाऱ्यांना त्यामुळे हायसे वाटले. शाखेतील स्थानिक मंडळींना पण त्याच्या संबंधित व्यापाऱ्यांना देण्यासाठी कॉईनच्या पिशव्या (बॅग) दिल्या गेल्या. परंतु त्या काही प्रमाणात कमी पडल्यामुळे ज्यांना त्या मिळाल्या नाहीत ती मंडळी साहजिकच नाराज झाली आणि तसे सूर उमटू लागले. दोन-तीन दिवस त्याचीच चर्चा शाखेत रंगत होती. सेव्हिंग बँक काऊंटरवर काम करणाऱ्या एका सहकाऱ्याच्या जेव्हा हे लक्षात आले त्या वेळेस तो जरा मोठ्या आवाजातच बोलला (ओरडलाच म्हणा ना), ‘अरे, काय कॉईन-कॉईन करत बसलात. 42 नंबरचे लेजर झटका त्यातून बरेच कॉईन बाहेर पडतील.’ 42 नंबरचे लेजर स्टाफ अकौंटचे होते आणि बऱ्याच (मोठ्या प्रमाणात म्हणा ना) खात्यांमध्ये पैशांमध्ये शिल्लक असायची. त्याच्या या समय सूचक विनोदामुळे गंभीर वातावरण क्षणात बदलून हास्याची वातावरण निर्मिती झाली. त्याच्या विनोदाला सर्वांनी मनापासून दाद दिली व पुढे कधी कॉईन न मिळाल्याची तक्रारीचा सूर उमटला नाही. आज या घटनेला 38 वर्ष होऊन गेलीत, पण आठवण अजूनही ताजी आहे. तो सहकारी मधून मधून भेटतो. त्यावेळेस त्या प्रसंगाची त्याला आठवण करून दिल्याशिवाय मला चैन पडत नाही.

-विजय वैद्य

(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..