लेक चालली सासरी,
डोळ्यांच्या कडा पाणावल्या,
आज निघाली आपल्या घरी,
तिच्याही पापण्या ओलावल्या,–!!
काळीज तिचे *धपापे*,
*अंतर्नाद* ऐकू येती,
उलघालीचे स्वर *बोलके*,
थेट कानास बघा भिडती,–!!!
बदलले जीवन सारे,
मांडेल नवीन संसारा,
मने आमुची *कृतार्थ* झाली,
लेक निघता *त्या* घरा,–!!!
जावई *समजूतदार* ते,
सासू सासरे *सूज्ञ* असती,
लेकी सुनांनी घर *भरले*,
*एकत्र* कुटुंब म्हटल्यावरती,–!!!
माणूस म्हटल्यावर तो *चुके*, सांभाळून घ्या हो सर्वांनी,
आई बापाचे मन *झुरते*,
एवढी ऐकावी *विनवणी*,–!!!
*लाडकी* सगळ्यांची असे,
तिचे *कौतुकच* आमच्या घरी, *कोवळे* वय आहे तिचे,
सारखी आम्हा वाटे *काळजी*,–!!
अनुभव नसल्यावर कसले, निभावेल कशी सासरी,–??
भिजून पुन्हा पुन्हा आमचे डोळे, तिची *पाठराखण* मन करी,–!!!
आई बाप आता तुझे,
सासू-सासरे केवळ नसती,
या घरात तुम्ही पाहुणे,
रिवाज *सामाजिक* आजमिती,–!
©️ हिमगौरी कर्वे
Leave a Reply