लेक चालली सासरी,
डोळ्यांच्या कडा पाणावल्या,
आज निघाली आपल्या घरी,
तिच्याही पापण्या ओलावल्या,–!!
काळीज तिचे धपापे,
अंतर्नाद ऐकू येती,
उलघालीचे स्वर बोलके,
थेट कानास बघा भिडती,–!!!
बदलले जीवन सारे,
मांडेल नवीन संसारा,
मने आमुची कृतार्थ झाली,
लेक निघता त्या घरा,–!!!
जावई समजूतदार ते,
सासू सासरे सूज्ञ असती,
लेकी सुनांनी घर भरले,
एकत्र कुटुंब म्हटल्यावरती,–!!!
माणूस म्हटल्यावर तो चुके, सांभाळून घ्या हो सर्वांनी,
आई बापाचे मन झुरते,
एवढी ऐकावी विनवणी,–!!!
लाडकी सगळ्यांची असे,
तिचे कौतुकच आमच्या घरी, कोवळे वय आहे तिचे,
सारखी आम्हा वाटे काळजी,–!!
अनुभव नसल्यावर कसले, निभावेल कशी सासरी,–??
भिजून पुन्हा पुन्हा आमचे डोळे, तिची पाठराखण मन करी,–!!!
आई बाप आता तुझे,
सासू-सासरे केवळ नसती,
या घरात तुम्ही पाहुणे,
रिवाज सामाजिक आजमिती,–!
हिमगौरी कर्वे©
Leave a Reply