सेप्टिसेमिक सेजच्या या पहिल्या टप्प्याच्या आजारानंतर ‘इम्युन फेज’ची सुरुवात होऊ शकते. हा टप्पा आपल्या शरीराच्याच प्रतिकारशक्ती प्रणालीमुळे (इम्युन मिडियेटेड) होणाऱ्या अवयवांच्या हानीमुळे होतो. यकृताला सूज येऊन कावीळ होऊ शकते किंवा यकृत काही प्रमाणात निकामी होऊ शकते. मूत्रपिंडाचे कामही कमी होऊ शकते. मेंदूला सूज येऊन मेनिंजायटीस किंवा मस्तिष्कदाह होऊ शकतो. फुप्फुसाला इजा होऊन (एआरडीएस) ही अतिउग्र परिस्थिती निर्माण होऊ शकते. विल्स सिण्ड्रोम या अतिउग्र लेप्टोस्पायरोसीसमध्ये अधिक प्रमाणात कावीळ होणे, यकृत व मूत्रपिंडाच्या समस्या निर्माण होणे, श्वसन संस्थेच्या समस्या (एआरडीएस), रक्तस्राव होणे, हृदयावर ताण येणे इत्यादी जीवनास धोकादायक गोष्टी होऊ शकतात. अशा वेळी रुग्ण आपले आयुष्य गमावू शकतो. कुठल्याही प्रकारच्या तापाला अंगावर न काढता तज्ज्ञाचा सल्ला घेणे ही उपचाराची पहिली पायरी आहे.
कावीळ दिसल्यास, डोळे लाल असल्यास, स्नायू खूप दुखत असल्यास इत्यादी लक्षणे दिसताच लेप्टोस्पायरोसीसची चाचणी करणे आवश्यक आहे. रक्तचाचणीद्वारे हा आजार सहज ओळखला जातो. पहिल्या टप्प्यात रक्ताचे कल्चर अथवा दुसऱ्या टप्प्यात रक्तातील अॅण्टिजेन व अॅण्टिबॉडी चाचणी करणे आवश्यक आहे. योग्य वेळी योग्य ती चाचणी केल्यास लेप्टोस्पायरोसीसचे निदान अचूक होऊ शकते. पेनिसिलिंग व डॉक्सिसायक्लिनसारख्या औषधांनी सौम्य प्रकारचा आजार बरा होतो. उग्र आजारात रुग्णाला भरती करून गरज वाटल्यास अतिदक्षता विभागात ठेवून अधिक कालावधीचे उपचार केले जातात. या आजाराला टाळणे शक्य आहे. मलप्रणालीतील
कर्मचाऱ्यांनी काम करताना पायात जाड गमबूट व हातात हातमोजे घालावे.
जाड पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात चालणे टाळावे किंवा गमबूट घालावे. जंगलात ट्रेकिंगला जाणाऱ्यांनीसुद्धा पायांची काळजी घ्यावी. हातापायावरच्या जखमा उघड्या ठेवू नये. या सर्व गोष्टी पाळल्यास आपण हा आजार टाळू शकतो. तुंबलेल्या पाण्यातून जावे लागल्यास हातपाय साबणाने स्वच्छ धुवावेत. प्रतिबंधक म्हणून डॉक्सिसायक्लिन २०० मि. ग्रॅम घ्यावे.
-डॉ. मंदार कुबल
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply