दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥संत ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानातून मांडलेले हे विचार जगाला मानवतेची शिकवण देतात. दिवाळी हा सण उत्साहाचा, आनंदाचा आणि नवे विचार नवी दिशा दाखवणारा सण, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा आणि जीवन उजळवून टाकणारा दीपोत्सवाचा सण, वाईट प्रवृत्तीचा नाश करुन चांगल्या गोष्टींचा स्वीकार करायला लावणारा सण. नवा जोश, नवा उत्साह घेऊन येणारा सण, मानवतेचा संदेश आणि शिकवण देणारा सण, मैत्री वाढवणारा आणि वैरभावना नष्ट करणारा सण, हर्षोल्लीत करणारा, सुखवणारा, नात्याची वीण घट्ट करणारा सण, दिवाळी नव्या सप्तरंगाची उधळण, दिवाळी म्हणजे नवे कपडे, नव्या वस्तुंचं भांडारच, दिवाळी म्हणजे आवडत्या वस्तुंची खरेदी आणि सोनेरी स्वप्नाची बरसात.
‘दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती’ या तत्वांना घेऊन आज आपण दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करुया. अलीकडच्या काळामध्ये दिवाळी हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो. आजच्या बदललेल्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नवनवीन वस्तुंची खरेदी करणे, वेगवेगळ्या ठिकाणी कुटुंबासमवेत फिरायला जाणे, मौज मजा करणे, मित्रांसोबत पार्टी करणे, भरमसाठ महागाचे फटाके फोडणे इतकाच मर्यादित अर्थ आजच्या तरुणाईला माहीत आहे. हे तरुणाईच्या वेगळ्या प्रकारच्या उत्साहावरुन आणि वर्तनावरुन जाणवते.
बदलती जीवनशैली, वाढते औद्योगिकीकरण, कारखानदारी, भांडवलशाही, दळणवळणाच्या साधनांची वाढ, चैनविलासी जीवनप्रवृत्ती, चंगळवाद यामुळे आजची तरुणाई दिशाहीन होताना दिसत आहे. तंत्रज्ञानांचा वाढता अमर्यादित वापर आणि संगणकाने घेतलेल्या मानवाच्या मेंदूवरील ताबा यामुळे स्वतः विचार करण्याची शक्तीच क्षीण होत चालली आहे. अश्या या बाहेर पडता न येणार्या जाळ्यात आम्ही सापडलेलो आहोत, पण आपल्या या समाजामध्ये असाही एक वर्ग चाचपडत आहे. दुर्लक्षिलेला आणि वंचित आहे. आम्हाला या वर्गाशी काही देणे घेणेच नाही. आम्ही फक्त पुस्तकातील प्रतिज्ञेपुरतं मर्यादित ठेवलं आहे त्यांना.
आजच्या काळात सहवास आणि संवाद हरवत चालला आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाला स्वतःसाठी आणि आपल्या परिवारासाठी देखील वेळ नाही. नात्यांची वीण मजबूत होण्याऐवजी ती दुभंगत चालली आहे. ऐहिक सुख आणि समाधानासाठी माणूस फक्त धावत आणि चाचपडत आहे. यंत्र तयार करणारा माणूस स्वतः यंत्र होऊन बसलेला आहे.जगण्याचे संदर्भ बदलत चालले आहेत. मोठ्या प्रमाणावर चंगळवाद वाढलेला आहे. नैतिक मूल्यांचा र्हास होताना दिसत आहे. या सगळ्या अधःपतनाने आपल्याला दीप होऊन तेवत राहायचे आहे. आजही सामाजिक भान आणि जाण असलेला समाज आणि तरुण मने आहेत. हे ही आम्हाला विसरून चालणार नाही. आपल्या देशाच्या विविध भागामध्ये सामाजिक संस्था, तरुण मंडळे, सेवाभावी संस्था, सामाजिक ऋण या जाणिवेतून काम करताना दिसत आहेत. ही गोष्ट खूपच स्वागतार्य आहे.
सामाजिक बांधिलकी या नात्याने समाजातील शांतता अबाधित राखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. ‘फुल नाही फुलाची पाकळी’ या नात्याने रंजल्या गांजल्यांसाठी आणि त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आपण सदैव पुढे आले पाहिजे आणि प्रत्येक चांगल्या लोकोपयोगी कार्यासाठी आपला हातभार लागला पाहिजे. ही सामाजिक कृतज्ञतेची भावना प्रत्येकामध्ये रुजणे आजच्या काळामध्ये अत्यंत गरजेचे आहे. सामाजिक, राजकीय वातावरण दूषित होत असताना प्रत्येकाने या देशाचा नागरिक या नात्याने या विषमतेच्या, जातीय आणि धर्मांधतेच्या वातावरणामध्ये दीप होऊन तेवत राहिले पाहिजे.
समाज आणि देशाचा विकास, उन्नती आजच्या नवयुवकांच्या हातामध्ये आहे याचं भान आणि जाण नक्कीच आजच्या युवकांमध्ये आहे. आजचा युवक नक्कीच संवेदनशील आहे, ‘देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे’ या विंदांच्या काव्यपंक्तीप्रमाणे आपल्याबरोबर वंचितांचे, दिन – दुबळ्यांचे आयुष्य आणि भविष्य उज्वल करण्याचे आणि आपल्या वंचित बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आपण सार्या देशबांधवांनी, नवयुवकांनी करायचे आहे. आज या मंगलमय दिवाळीच्या सणानिमित्त आपण सर्वांनी हीच प्रतिज्ञा आणि प्रार्थना करायची आहे की, सर्वांचं आयुष्य सुखी समाधानाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे होऊ दे, सर्व प्राणिमात्रांना चांगली बुद्धी लाभू दे, सर्वाचे कल्याण होऊ दे आणि सर्वांच्या सुखाच्या आनंदाचा हिस्सा होण्याचे भाग्य आम्हाला लाभू दे हीच आपल्याला ईश्वर चरणी प्रार्थना करायची आहे.
स्वतःपुरते जगणारे कधीच खरे आयुष्य जगू शकत नाहीत ज्याला दुसर्याच्या दुःखाचा कळवळा आहे, दुसर्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून ज्याचा उर भरुन येतो, ज्याला एकमेकांप्रती आपुलकी आणि सद्भावना आहे, मग तो मुका प्राणी का असेना; अश्या या आत्मीयता, आपुलकी, आपलेपण, बांधिलकी, समता, बंधुता असलेला समाज आणि व्यक्तीच बदल घडवू शकते आणि अश्या प्रकारचा समाज आणि व्यक्ती आपल्या समाजामध्ये आहे म्हणूनच हा समाज, हा देश तरलेला आहे. हीच आशा आणि अपेक्षा यापुढील काळातील तरुणाईकडूनही आहे.
चला तर मग आपल्या आनंदाबरोबर सर्वांचा आनंद द्विगुणीत करुया, अनेक संकटे येतील त्या संकटांना तोंड देण्याचं सामर्थ्य आणि धाडस नक्कीच प्रत्येकामध्ये येवो आणि दुःखाच्या, संकटाच्या खाईतून सर्वांना तारुन पुढे घेऊन जावो हीच सद्भावना आणि प्रार्थना. दुसर्याच्या चेहर्यावरील दुःख तर आपण अनेकदा पाहत असतो पण इतरांच्या चेहर्यावरील आनंद पाहण्याचे भाग्य क्वचितच काही जणांना लाभत असते, समोरच्या व्यक्तीच्या आनंदाचे कारण जर आपण असेल तर जगातील कोणत्याही आनंदापेक्षा हा आनंद सर्वात मोठा असतो. तर चला मग आज दिवाळीच्या क्षणाला इतरांच्या आनंदाचे कारण बनूया.
आज आपल्या देशाच्या विविध भागामध्ये वृद्धाश्रम, अनाथ, निराधार आश्रम, महिला बालगृहे, निरिक्षण गृहे, शिशुगृहे, बालकल्याण आश्रम, डेस्टीट्युट चिल्ड्रेन होम, गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, अंध – अपंग कल्याणकारी संस्था, महिला कल्याण आश्रम, निराधार महिला प्रसुतिगृहे आहेत या सर्व संस्थांना सेवाभावी वृत्तीने मदतीसाठी हात पुढे आले पाहिजेत आणि दिवाळीचा आनंद स्वतःबरोबर आपल्या बांधवांचा आनंदही द्विगुणीत केला पाहिजे. पर्यावरणाचा विचार करुन कोणताही सण साजरा करणे गरजेचे आहे. याचे कारण हेच आहे कि, आपण सर्वजण निसर्गावर अवलंबून आहोत. निसर्ग जर संतुलित ठेवला तरच आपले आरोग्य संतुलित राहणार आहे, याचे भान आपल्या सर्वांना असले पाहिजे. शहरीकरण झपाट्याने वाढत आहे आणि त्यामुळे यंत्रासारखे माणसाला काम करावे लागत आहे, याचा आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य अबाधित आणि निरोगी राखण्यासाठी सण सभारंभाच्या, उत्सवाच्या उत्साहामध्ये रंगाचा बेरंग होऊ नये याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.
सामाजिक बांधिलकी या नात्याने समाजातील शांतता अबाधित राखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. ‘फुल नाही फुलाची पाकळी’ या नात्याने रंजल्या गांजल्यांसाठी आणि त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आपण सदैव पुढे आले पाहिजे आणि प्रत्येक चांगल्या लोकोपयोगी कार्यासाठी आपला हातभार लागला पाहिजे. ही सामाजिक कृतज्ञतेची भावना प्रत्येकामध्ये रुजणे आजच्या काळामध्ये अत्यंत गरजेचे आहे. सामाजिक, राजकीय वातावरण दूषित होत असताना प्रत्येकाने या देशाचा नागरिक या नात्याने या विषमतेच्या, जातीय आणि धर्मांधतेच्या वातावरणामध्ये दीप होऊन तेवत राहिले पाहिजे.
समाज आणि देशाचा विकास, उन्नती आजच्या नवयुवकांच्या हातामध्ये आहे याचं भान आणि जाण नक्कीच आजच्या युवकांमध्ये आहे. आजचा युवक नक्कीच संवेदनशील आहे, ‘देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे’ या विंदांच्या काव्यपंक्तीप्रमाणे आपल्याबरोबर वंचितांचे, दिन – दुबळ्यांचे आयुष्य आणि भविष्य उज्वल करण्याचे आणि आपल्या वंचित बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आपण सार्या देशबांधवांनी, नवयुवकांनी करायचे आहे. आज या मंगलमय दिवाळीच्या सणानिमित्त आपण सर्वांनी हीच प्रतिज्ञा आणि प्रार्थना करायची आहे की, सर्वांचं आयुष्य सुखी समाधानाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे होऊ दे, सर्व प्राणिमात्रांना चांगली बुद्धी लाभू दे, सर्वाचे कल्याण होऊ दे आणि सर्वांच्या सुखाच्या आनंदाचा हिस्सा होण्याचे भाग्य आम्हाला लाभू दे हीच आपल्याला ईश्वर चरणी प्रार्थना करायची आहे.
स्वतःपुरते जगणारे कधीच खरे आयुष्य जगू शकत नाहीत ज्याला दुसर्याच्या दुःखाचा कळवळा आहे, दुसर्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून ज्याचा उर भरुन येतो, ज्याला एकमेकांप्रती आपुलकी आणि सद्भावना आहे, मग तो मुका प्राणी का असेना; अश्या या आत्मीयता, आपुलकी, आपलेपण, बांधिलकी, समता, बंधुता असलेला समाज आणि व्यक्तीच बदल घडवू शकते आणि अश्या प्रकारचा समाज आणि व्यक्ती आपल्या समाजामध्ये आहे म्हणूनच हा समाज, हा देश तरलेला आहे. हीच आशा आणि अपेक्षा यापुढील काळातील तरुणाईकडूनही आहे.
चला तर मग आपल्या आनंदाबरोबर सर्वांचा आनंद द्विगुणीत करुया, अनेक संकटे येतील त्या संकटांना तोंड देण्याचं सामर्थ्य आणि धाडस नक्कीच प्रत्येकामध्ये येवो आणि दुःखाच्या, संकटाच्या खाईतून सर्वांना तारुन पुढे घेऊन जावो हीच सद्भावना आणि प्रार्थना. दुसर्याच्या चेहर्यावरील दुःख तर आपण अनेकदा पाहत असतो पण इतरांच्या चेहर्यावरील आनंद पाहण्याचे भाग्य क्वचितच काही जणांना लाभत असते, समोरच्या व्यक्तीच्या आनंदाचे कारण जर आपण असेल तर जगातील कोणत्याही आनंदापेक्षा हा आनंद सर्वात मोठा असतो. तर चला मग आज दिवाळीच्या क्षणाला इतरांच्या आनंदाचे कारण बनूया.
— परशुराम चंद्रकांत माळी
Leave a Reply