जीवनातला शेवटचा टप्पा वार्धक्य. याची आखणी जर तरुणपणापासून व्यवस्थित केली तर हा अटळ प्रवास आनंदमयी होईल. आयुष्याचा आलेख पाहिला तर जन्मापासून पंचविशीपर्यंत चढण असते, पंचविशीनंतर तिशीपर्यंत सपाट पठार व तिशीनंतर घसरण सुरू होते, पण ती वर्षाला १ टक्का इतकी मंद असल्याने लक्षातही येत नाही.
वार्धक्य लांब ठेवायचा हाच खरा काल. त्यावरच शास्त्रज्ञांनी आपले लक्ष केंद्रित केले. उद्देश- येणारे वार्धक्य कमीतकमी शारीरिक हानी होऊन सुखकारक करणे. वार्धक्यावर बरेच संशोधन चालू आहे. मुक्त मुलांकुरांचा सिद्धांत ग्रा’ वाटतो. मुक्त मुलांकूर अन्नातून मिळतात. हे विद्युतभारित असून, त्या रेणूत एक एकांडा इलेक्ट्रॉन असतो. हा शेजारच्या प्रथिन, मेद, वा कार्बोदकातील इलेक्ट्रॉन चोरतो. उरलेला ऑक्सिडेशनचा कचरा शरीरात साठत गेल्यास वार्धक्याकडे वाटचाल होते. नवीन संशोधनाप्रमाणे गुणसूत्रांच्या टोकावर टेलोमरचा टोपीसारखा घटक असतो. त्यात टेलोमरेझ हा विकर असतो. त्याच्या क्रियेमुळे टेलोमरची लांबी कमीजास्त होते. टेलोमर लांब झाला तर वार्धक्य उशिरा येते, आखूड राहिला तर लवकर येते. ज्या व्यक्तींचे लहानपणापासून खाणे कमी व नियंत्रित असते त्यांच्यात ऑक्सिडेशन कमी होऊन वार्धक्य लांबणीवर पडते व जास्त निरोगी होते. नेहमीच्या पेशी चयापचयात मुक्त मुलांकूर निर्माण होतातच त्यात भर पडते. प्रदूषण, किरणोत्सार व काही पदार्थांची. चाळीशीनंतर वार्धक्याचा त्वचेवर दृष्य परिणाम दिसतो. त्वचेची लवचिकता कमी होते, सुरकुत्या पडतात, त्वचा लोंबते, कोरडी पडते, धर्मग्रंथींचे कार्य मंदावते, जंतूसंसर्ग होतो. उष्णतेचा समतोल बिघडतो. मेलॅनीन कमी होऊन केस पिकतात व गळतात.
धूम्रपान करणाऱ्यांच्यात या बदलांचा वेग जास्त असतो. हृदय व रक्ताभिसरण संस्थेवरही परिणाम होतो. हृदयाच्या स्नायूची क्षमता कमी होऊन कार्य मंदावते. रक्तातील मेदाचे प्रमाण
वाढते. कोलेस्टेरॉल, एल. डी. एल. कुतूहल92 वाढते, एच. डी. एल. कमी होते. धमन्यांच्या आतील स्तरावर मेदाचा थर येऊन त्या आकुंचन पावतात. परिणामी वाढतो.
रक्तदाब – अवयवांचा रक्तपुरवठा कमी होऊन त्यांच्या कार्यावर परिणाम होतो.
कॉरोनरी धमनीत थर साचला तर छातीत दुखू लागते, हार्ट ॲटॅकही येतो. ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक. बायपासची शस्त्रक्रिया केल्यावर आयुष्याचे राहणीमान सुधारून व्यक्ती क्रियाशील व स्वावलंबी होते. बहिरेपणा आल्यास श्रवणयंत्र लावावे. ऐकू चांगले येऊन आत्मविश्वास वाढेल.-
– डॉ. शशिकांत प्रधान
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply