नवीन लेखन...

लेव्हल क्रॉसिंग गेटस (रेल्वे फाटक)

भारतीय रेल्वेचं जाळं हे शहरं, गावं, खेडी यांना छेदत जातं. रेल्वेमार्गांच्या दुतर्फा वसाहती असतात. या वसाहतींतील रहिवाशांना दोन्ही बाजूंनी जाता-येताना रेल्वेमार्ग ओलांडावाच लागतो.

भारतात अशा लेव्हल क्रॉसिंगच्या ३२,६९४ जागा असून, त्यांतील १७,८४१ ठिकाणी रेल्वेचा कर्मचारी २४ तास हजर राहून राखण करतो; परंतु १४,८५३ क्रॉसिंगच्या जागांवर कोणीही कर्मचारी नेमलेला नसल्यामुळे मार्ग असे नेहमीच सर्वांसाठी खुले असतात.

जिथे रेल्वेचे कर्मचारी नेमलेले असतात, अशा रेल्वे लेव्हलक्रॉसिंगच्या तीन प्रकारच्या श्रेणी ठरविण्यात आल्या आहेत. त्या क्रॉसिंगच्या ठिकाणी जाणाऱ्या व येणाऱ्या रेल्वेगाड्यांचा आकडा व त्याच्या प्रमाणात तेथून जा-ये करणाऱ्या इतर वाहनांच्या संख्येवर या श्रेणी आधारित असतात.

ट्रेन व्हेईकल युनिट (टी.व्ही.यू.) हे एक परिमाण ठरविलेलं आहे. मोटार, लॉरी, बैलगाडी, टांगा हे एक युनिट, तर दोन चाकी सर्व वाहनांना अर्धा युनिट असं परिमाण धरलं जातं. या हिशोबाप्रमाणे,

श्रेणी A साठी ३० ते ५०,००० टी.व्ही. युनिट

श्रेणी B साठी २० ते ३०,००० टी.व्ही. युनिट

श्रेणी C साठी B श्रेणीखालील कोणतेही टी.व्ही. युनिट असं परिमाण धरलं जातं.

वरील तीनही श्रेणींच्या लेव्हलक्रॉसिंगची इंटरलॉकिंग ऑटोमॅटिक गेट्स गाडीच्या वेळेशी जुळवलेली असतात. त्यावर गेटमनचं नियंत्रण असतं. काही छोट्या गावांजवळील लेव्हलक्रॉसिंगगेटच्याजवळ रेल्वे कर्मचारी असतो. गेट उघडणं, बंद ठेवणं याची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर सोपवलेली असते. येथे काही वेळा या कर्मचाऱ्यांना दबावाखाली आणून किंवा पैशांची लालूच दाखवून बळजबरीने गेट उघडण्यासाठी भाग पाडलं जातं व परिणामी भीषण अपघातांना आमंत्रण दिलं जातं. दुर्दैवानं, अशी अनेक उदाहरणं घडलेली आहेत.

लेव्हलक्रॉसिंगगेटवर कोणीही जबाबदार कर्मचारी नसणं ही भारतीय रेल्वे पुढे फार मोठी बिकट समस्या आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. खेड्यातील जनतेत याबाबतची जागृती व्हावी यासाठी उद्बोधनाचे कार्यक्रम सतत राबविले जाणं गरजेचं आहे. लेव्हल क्रॉसिंगजवळून गाडी नेताना शिट्टीचा अखंड वापर करावा अशा सूचना इंजिन ड्रायव्हर्सना दिलेल्या आहेत.

लेव्हलक्रॉसिंगचेदरवाजे सौरऊर्जेवर उघडण्याची सोय काही ठिकाणी करण्यात .

आली आहे. काही जागी भुयारी मार्ग केले जात आहेत. केरळमधील अलापुसा जिल्ह्यात आता एकही लेव्हल क्रॉसिंग विना कर्मचारी नाही. प्रगतीचं हे एक फार मोठं द्योतक आहे. लेव्हलक्रॉसिंगच्यागेटवरील जबाबदार रेल्वे कर्मचाऱ्यास डोळ्यांत तेल घालून मार्गावर लक्ष ठेवावं लागतं.

२०१३ साली बांद्रा-डेहराहून एक्सप्रेस या गाडीच्या तीन डब्यांना लागलेली आग ही प्रथम एका लेव्हलक्रॉसिंगवरील कर्मचाऱ्याच्याच लक्षात आली. त्यानं त्वरित जवळील स्टेशनमास्तरशी फोनवरून संपर्क साधला, लगेचच तेथून इंजिनड्रायव्हरला सूचना मिळाल्या व गाडी ताबडतोब थांबवली गेली.

लेव्हलक्रॉसिंगवरील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे अतिशय मोठा अनर्थ टळला.

लेव्हलक्रॉसिंगवरचे सजग कर्मचारी, रेल्वे लेव्हलक्रॉसिंग गेट, लेव्हल क्रॉसिंग हा रेल्वे वाहतुकीतला अनन्यसाधारण महत्त्वाचा असा भाग आहे.

लेव्हलक्रॉसिंगगेटस (नवी योजना)

२०१२ ते २०१७ या ५ वर्षांच्या योजनेबाबत आज जे काम सुरू आहे, त्यानुसार ९,८०८ कर्मचारीविरहित लेव्हल क्रॉसिंग्ज बंद करून तेथे कर्मचारी व अद्ययावत यंत्रणा उभारली जाईल. या प्रत्येक लेव्हल क्रॉसिंगमागे ४.४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामुळे ४४ टक्क्यांनी अपघात कमी होण्याची शक्यता आहे.

-डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..