नवीन लेखन...

जीवन “मॅरेथॉन”असते, “स्प्रिंट” नव्हे !

अपयशच येऊ नये, अशी सध्या समाजाची एकूण धारणा झालीय आणि त्याची सुरुवात कच्च्या-बच्य्या वयापासून होते. जीवन “जगण्यासाठी नसून “धावण्यासाठी “असते, हा समज पालक आणि चालक मिळून बालकांच्या डोक्यात कोंबण्यात यशस्वी झाले आहेत. शाळेत विविध क्लासेस, सुट्टीत पोहणे, नृत्य, गायन,चित्रकला यांचा भडिमार असतो. महाविद्यालयात सेमिनार, कॉन्फरन्सेस, स्पर्धा, व्हिजिटस, इंटर्नशिप यांचा मारा असतो. श्वास घ्यायला फुरसत मिळू नये अशीच जीवनाची संरचना गेल्या २-३ दशकांपासून करण्यात आलीय. आणि या सर्व उपक्रमांमध्ये “पहिला” नंबर आलाच पाहिजे हा अट्टाहास जीवघेणा ठरतोय. त्यामुळे ही धावाधाव किती ताणदायी ठरतेय याकडे पाहायलाही संवेदना उरली नाहीए. “थ्री इडियटस “मध्ये अमीर खान म्हणतो तसं मेंदूवरील प्रेशर मोजणारे यंत्रच नाहीए. अपयशांचे अनुभव आणि त्यापासून मिळणारे शिक्षण नाकारले जाते आहे. शर्यतीत पहिले पाऊल टाकल्यापासून विजयी रेषेपर्यंत “पळा, पळा , कोण पुढे पळतो तो ” अशी उदघोषणा सतत कानी येत असते. त्यामुळे कोठल्याही स्पर्धेत दुसरा क्रमांक स्वीकारायचाच नाही, अशी मनोभूमी बालकांची तयार झालीय. अगदी नावडत्या विषयात अथवा उपक्रमातही सदैव प्रथमच आले पाहिजे, हे मनावर बिंबवले जाते आहे. आणि आवडत्या विषयाची निवड करायलाही त्यांना मनाई केली जाते. या प्रक्रियेला ” सर्वोत्कृष्ट मेंढी ” म्हणून ओळखले जाते.

खऱ्या जगात हे “ सर्वोत्कृष्ट मेंढरू “ फार पुढे प्रगती करू शकत नाही, हे दुर्दैवी सत्य आहे. दहावी-बारावीच्या मेरीट लिस्टमध्ये आलेल्यांच्या भावी यशाचा (?) आलेख हा संशोधनाचा विशेष झालेला आहे.

हे “सो कॉल्ड ” बुद्धिमान पदवीधरांचे ” पीक” नौकरी मिळविताना थकून जाते आणि वेगवेगळ्या आजारांचे शिकार होते. त्यांना तरुण वयात निद्रानाश, मधुमेह, रक्तदाब आणि स्थौल्य अशा विकारांना सामोरे जावे लागते. याला संशोधकांनी ” Quarter -Life Crisis ” असे नामाभिधान दिले आहे.
आजच्या तरुणांनी त्यांच्या बाल्याचा अपरिमित त्याग करीत त्यांच्या शालेय जीवनात बरंच गमावलंय. या श्रमांचं चीज व्यावसायिक जीवनात होईल अशी भाबडी आशा बाळगून ते वाटचाल सुरु करतात. पण त्यांच्या आधीच्या पिढीला हे माहित असते की ही फक्त सुरुवात असते. अभ्यास आणि इतर उपक्रमांमध्ये वर्षे व्यतीत (की वाया गेल्यावर ?) केल्यावर त्यांना हे विदारक सत्य जाणवते की हा सगळा प्रवास /ही सगळी दमछाक फक्त बायोडेटा तगडा करण्यासाठी आणि पदव्यांचे भेंडोळे जमा करण्यासाठी होता / होती. शारीरिक/मानसिक क्षमतांवर अतिरिक्त ताण आल्याने बधिरता आलेली असते. आणि नकारार्थी अभिप्राय स्वीकारण्याची त्यांची मानसिकता नसते किंवा अपयश आले की ते कोलमडून जातात. ही अवस्था त्यांच्या पालकांपेक्षा ३६० अंश विरुद्ध असते. त्यांच्या पालकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सामोरे आलेल्या आव्हानांना नमवित शिक्षण घेतलेले असते आणि शक्य तितकी प्रगती साध्य केलेली असते. त्यांना आपल्या पाल्यांना एवढच सांगायचं असतं-

” बाळांनो, Life is a marathon, not a sprint, so pace yourself accordingly.”

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..