नवीन लेखन...

लाइफस्टाइलने जगण्यासाठी

हजार रुपयांचा शर्ट, आठवड्यातून एकदा वापरला असा पाच वर्षे गेला तर त्याची पर डे किंमत चार रुपये पडते. कपडे बूट चपला मिळून रोजचे जास्तीतजास्त २५ रुपये, जेवण चहा नाश्ता रोज सत्तर ते शंभर रुपये. अगदी साधी गाडी घेतली तर रोज शंभर रुपये, म्हणजे माणशी पंचवीस रुपये आणि दुचाकी रोज माणशी वीस रुपये. घरभाडे रोज माणशी पावणे दोनशे रुपये. शहरात रहायचे असेल तर रोजचा अगदी मूलभूत खर्च माणशी पावणेचारशे रुपये इतका येतो. कपडे धुणे माणशी रोज दहा रुपये, चारचाकी गाडी मेंटेनन्स माणशी पंचवीस रुपये, घराची स्वच्छता आणि किरकोळ दुरुस्ती माणशी रोज खर्च वीस रुपये, दुचाकी मेंटेनन्स रोज माणशी पाच रुपये. पेट्रोल खर्च माणशी रोज पन्नास रुपये इतका येतो. मेंटेनन्सचा खर्च रोज माणशी एकशे दहा रुपये इतका येतो. चारचाकी नसेल तर रोजचा माणशी खर्च तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि चारचाकी असेल तर माणशी रोजचा खर्च पाचशे रुपये इतका येतो.

शिक्षणावर शहरी माणूस सर्वात जास्ती खर्च करतो, शिक्षणाचा रोजचा माणशी खर्च दीडशे रुपयांच्या आसपास जातो. स्पेशल ट्युशन्स लावल्या, काही कला किंवा खेळाचे प्रशिक्षण घेतले तर तो खर्च कितीही वाढू शकतो. यामध्ये चार जणांचे कुटुंब गृहीत धरलेले आहे.माणशी रोजचा खर्च पावणे पाचशे ते साडेसहाशे इतका येतो.याच्या पुढचे उत्पन्न हे गुंतवणूक म्हणून वापरता येऊ शकते. शेयर ट्रॅव्हलींग, सरकारी शाळेत शिक्षण, घरामध्ये गुंतवणूक, पब्लिक व्हेईकलने प्रवास, स्वतः कला किंवा खेळामध्ये पारंगत असल्याने आणि स्वतःच्या अंगी मुलांना शिकविण्याची कला असल्याने होणारी शैक्षणिक खर्चातली बचत या गोष्टींमुळे आपली चांगली बचत होऊन आपले लिव्हिंग स्टँडर्ड बिगर खर्चामध्ये खूप वाढू शकते.आपले खर्च वाढवून आपले लिव्हिंग स्टँडर्ड वाढविण्याच्या ऐवजी आपल्यातली कौशल्ये विकसित करून आपण आपले लिव्हिंग स्टँडर्ड वाढवले तर ते कायमस्वरूपी वाढू शकते.कौशल्ये विकसित केली तर उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतात आणि खर्चाला आळा बसतो.आपण कोणत्या गोष्टीवर किती खर्च करायचा आणि त्यासाठी कुठून पैसे वाचवायचे किंवा कुठून नव्याने तयार करायचे? यासाठी मी अगदी पंचवीशीत तिशीत असताना हे गणित तयार केलं होतं.त्याचे परीणाम मला हळूहळू पस्तिशीत दिसू लागले आणि मी भरपूर फिरलो.सध्या मी वापरत असलेली एखादी फॅसिलिटी कमी करताना त्याबदल्यात मी नवीन काहितरी मिळवतो त्यामुळे मला त्याचे आजिबात वाईट वाटत नाही.विनाकारण आणि महागडे हॉटेलिंग महागडा स्टे आणि तात्पुरत्या मजेसाठी मी खर्च करू शकत नाही त्याचे कारण माझ्या काटेकोर पर डे पर पर्सन खर्चाच्या हिशेबामध्ये आहे.

आजकाल आमचे हे हिशेब कुठे काम करताना दिसत नाहीत. आजकालची तरुण पिढी बिनधास्तपणे अनप्रॉड्कटिव्ह खर्च करताना दिसते, त्यांना त्यांच्या उत्पन्ना विषयीची खात्री असल्याशिवाय ते असा खर्च करू शकणार नाहीत. भूक लागली तर आम्ही घरात थालिपीठ पोहे सांजा करून खाऊ, त्याला आम्ही चैन म्हणतो, आजकालची पिढी स्वीगी नाहीतर झोमॅटो किंवा तत्सम कुणालातरी फोन फिरवतात आणि चार सहाशे रुपये सहजपणे खर्च करू शकतात. मुलांना शिकवत बसण्यापेक्षा किरकोळ गोष्टी शिकविण्यासाठी, मुलांना महागड्या ट्युशन्स ते सहजपणे लावू शकतात.

मुलांना आपल्या गाडीवर बसवून किंवा गाडीत बसवून त्याच्या बरोबर फिरण्याच्या ऐवजी आपल्याच मुलांच्या स्पर्शाचे सुख अनुभवण्या ऐवजी आजकालचे तरुण त्यांचे त्यांचे खर्चिक प्रोग्रॅम्स ठरवतात, याचेही मला खूप अप्रूप वाटते. मुलांबरोबर ते कसे बॉंडिंग करत असतील याची मला फार उत्सुकता आहे. त्यांची पर्चेसिंग पॉवर जास्ती असावी किंवा त्यांना त्यांचे उत्पन्न सदैव असेच टिकून राहणार असल्याची खात्री असावी. त्याशिवाय हे होऊ शकत नाही. नव्या शिक्षणाने माणसाला आर्थिकदृष्ट्या खूप सुरक्षित केले असावे. मला मात्र आजही भविष्याची काळजी वाटते. औषधांपेक्षा व्यायाम बरा, आजारपणांपेक्षा घरगुती आहार बरा, मौजमजे पेक्षा छंद बरा, असे अगदी जुने आणि मूलभूत विचार घेऊन आम्ही जगतो आहोत. त्यातच सुखी आणि समाधानीही आहोत. नव्या पिढीचे उत्पन्नही अचाट आहे आणि त्यांचे राहणीमानही खूपच वेगळे आहे. त्यांना त्यांच्या लाइफस्टाइलने जगण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

विनय भालेराव.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..