नवीन लेखन...

लाईटबोर्ड उर्फ लर्निंग ग्लास

लॉकडाऊन सुरू झाले आणि घरून काम करणे सुरू झाल्यावर एरवी प्रवासात वाया जाणारे दिवसाचे चक्क चार तास पदरात पडले! इतके दिवस करू करू म्हणून राहून गेलेल्या कित्येक गोष्टी करण्याचा हीच एक चांगली वेळ होती. अगदी पहिल्या दिवसातून ऑनलाईन शिकवणे सुरू असल्यामुळे याच बाबतीत मी बरेच काही प्रयोग केले, विविध अँप्लिकेशन्स वापरून पाहिली. त्या सर्व प्रयोगांपैकीच एक प्रयोग म्हणजे लाईट बोर्ड.

जेव्हा आपण मुलांकडून दिवसाचे चार तास ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करायची अपेक्षा करतो तेव्हा विविध गोष्टींचा वापर करून आपली लेक्चर्स जास्तीत जास्त इंटरेस्टिंग कशी होतील याची जबाबदारी प्रत्येक लेक्चररची असते. गुगल मीट किंवा झूम वर घेतलेली त्याच त्याच प्रकारची लेक्चर्स कंटाळवाणी ठरू शकतात. तसेच क्लासरूम मध्ये ब्लॅकबोर्ड कडे तोंड करून लिहिताना रेकॉर्ड केलेल्या लेक्चर्समध्ये बऱ्याचदा विद्यार्थी लेक्चरर च्या चेहऱ्याकडे पाहू शकत नाही. आधुनिक तंत्रज्ञान आणि जुन्या पद्धतीने वापरला जाणारे “खडू फळा” टेक्निक याचा संगम म्हणजे हा “लाइटबोर्ड” किंवा “लर्निंगग्लास’
पारदर्शक काचेच्या सभोवती लावलेल्या LED स्ट्रिप्समधून बाहेर पडलेली लाईट काचेमध्ये अडकून राहते आणि आपण जेव्हा निऑन मार्कर पेन वापरून अशा काचेवर लिहितो तेव्हा ही लाईट त्या अक्षरांमधून बाहेर येते. कॅमेरा आणि शिक्षक यांच्या मध्ये असलेल्या या ग्लासच्या आरपार दिसत असल्याने शिकविणाऱ्याचे तोंड हे सदा कॅमेऱ्याकडे राहते. कॅमेऱ्याची सेटिंग्ज आणि थोडेसे व्हिडीओ एडिटिंग केले की सुंदर ट्रेनिंग व्हिडीओ तयार होतात. त्याच्या जोडीला OBS स्टुडिओ या सॉफ्टवेअर ची जोड दिली की तुम्ही युट्युब किंवा फेसबुकवर लाईव्ह पण जाऊ शकता!

ज्यांना कुणाला ऑनलाईन ट्रेनिंग व्हिडीओ बनवायचे असतील त्यांना लाईट बोर्ड नेमका कसा असतो आणि तो नेमका कसा बनवायचा याबद्दल संपूर्ण माहिती हवी असल्यास माझ्या Career Sochh. या युट्युब चॅनल ला जरूर भेट द्या. यापुढच्या व्हिडीओ मध्ये विविध साधनांचा वापर करून ऑनलाईन ट्रेनिंग व्हिडिओ कसे बनवायचे याबद्दलचे मार्गदर्शन पण नक्की करेन.

Avatar
About श्रीस्वासम 15 Articles
अभियांत्रिकी शिक्षणाच्या आणि करिअर मार्गदर्शनाच्या क्षेत्रात गेल्या एकवीस वर्षांपासून कार्यरत. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी विविध अभ्यासक्रमांची आखणी व अभियांत्रिकीशी संबंधीत दोन पुस्तकांचे लेखन. शालेय जीवनापासून मराठी साहित्यामध्ये विशेष रुची. कविता, प्रवासवर्णन, द्वीपदी, आठवणी यांच्या माध्यमातून होणारे मराठी लेखन हे मुख्यत्वेकरून जीवनानुभवांवर आधारीत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..