भारतीय पिता आणि आयरिश मातेपोटी जन्मलेल्या लिला नायडू यांनी १९५४ साली ‘मिस इंडिया’ हा बहुमान पटकावला होता. ‘व्होग’ नियतकालिकानेही जगातील पाच सौंदर्यवताइपैकी एक असा त्यांचा उल्लेख केला होता.
त्यांचे पिता, डॉ. रामैय्या नायडू एक ख्यातनाम अणु संशोधक होते तर आई स्विस मुळाची भारतीय संस्कृतीची (Indology)अभ्यासिका होती – त्यांच्या कडूनच लीला नायडू यांना भारतीय आणि युरोपियन मिश्रित सौंदर्याचा वारसा मिळाला होता! त्यामुळेच त्यांच्या सौंदर्यातील वेगळेपणा हा त्या काळच्या हिरोइन्स (नर्गिस, मीना कुमारी इ.) मध्ये उठून दिसायचा.
बलराज साहनी यांच्या ‘अनुराधा’ चित्रपटापासून नायडू यांनी १९६० मध्ये चित्रपटातील कारकिर्दीस प्रारंभ केला होता. बॉलीवूड मध्ये लीला नायडू सारखे आरस्पानी सौंदर्य लाभलेल्या नायिका फारच कमी पहावयास मिळतील. “वोग” (Vogue ) सारख्या आंतरराष्ट्रीय आणि ख्यातनाम मासिकाने १९५०-६० च्या दशकात या आकर्षक आणि डौलदार व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या अभिनेत्रीचा समावेश “जगातील १० अति सुंदर” महिलांमध्ये उगाचच केला नव्हता!
हृषीकेश मुखर्जी यांनी डायरेक्ट केलेला “अनुराधा” हा लीला नायडू यांचा बॉलीवूड मधील पहिला चित्रपट! या चित्रपटात त्यांनी अशा एकाकी पडलेल्या पत्नीची भूमिका अतिशय उठावदार पणे केली कि जी आपले सारे गानविश्वातील करिअर आपल्या डॉक्टर पतीकरता (बलराज सहानी) करिता सोडून देते. या चित्रपटाची गणना एका महान बॉलीवूड चित्रपटांमध्ये होते.
पंडित रविशंकर यांनी दिलेले अतिश्रवणीय संगीत (जाने कैसे सपनोमे, कैसे दिन बीते इ. गाणी) आणि बलराज सहानी यांचा दमदार अभिनय ह्या “अनुराधा” या चित्रपटाच्या इतर जमेच्या बाजू! या चित्रपटाला १९६१ चा भारत सरकारचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार आणि बर्लिन आंतराराष्ट्रीय फिल्मोत्सव पुरस्कार मिळाला!
“येह रास्ते हैं प्यारके” हा त्यांचा अजून एक गाजलेला चित्रपट (१९६३)! ह्या चित्रपटाची कथा त्या वेळच्या गाजलेल्या “नानावटी प्रेमप्रकरण” यावर आधारित होती. ह्या चित्रपटात सुनील दत्त, रेहमान आणि लीला नायडू यांनी हा प्रेमाचा त्रिकोण अतिशय समर्थपणे साकारला आहे. खरे तर, ही अपारंपारिक भूमिका स्वीकारावयास त्या वेळच्या कोणत्याही प्रसिद्ध नायिका तयार नव्हत्या. पण लीला नायडू यांचा दाखविलेला धीटपणा त्यांच्या चांगलाच उपयोगी पडला आणि हा चित्रपट हिट ठरला!
जेम्स आईव्हरी यांचा “The householder” (१९६३) आणि श्याम बेनेगल यांचा “त्रिकाल” (१९८५) हे लीला नायडू यांचे इतर गाजलेले चित्रपट! श्याम बेनेगल तर लीला नायडू यांच्या अभिनया बद्दल म्हणतात “It was a sheer haunting experience to work with Leela Naidu, who breethed innocence and serenity in her performance!”
परंतु, इतक्या प्रतिभाशाली अभिनेत्रीला केवळ बोटावर मोजण्या इतकेच चित्रपट मिळाले – कदाचित त्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि तेजस्वी प्रतिभा त्यांच्या प्रगतीआड आली असावी!
लीला नायडू यांचे वैयक्तिक आयुष्य तितके सुखकारक नव्हते. त्यांचे दोनदा लग्न आणि घटस्फोट झाले – टिक्की ओबेरॉय (ओबेरॉय हॉटेल्स चे मालक) आणि डोम मोरास (कवी आणि लेखक) यांच्याबरोबर! त्यांनी आपल्या जीवनाची शेवटची काही वर्षे एकाकीपाणेच घालविली. या एकटेपणात त्यांना जे. कृष्णमुर्ती यांच्या शिकवणुकीची खूप साथ मिळाली.
लीला नायडू यांचे २८ जुलै २००९ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply