नवीन लेखन...

लिंबलोण उतरू कशी ?

“एकटी ” मधल्या सुलोचना दीदी कायम “आई “दिसल्या – मुलामध्ये आणि संकटांमध्ये ठाम उभ्या असलेल्या आईसारख्या ! गीतातील भाव चेहेऱ्यावर साकार करणाऱ्या ! सकाळी सकाळी सुमन कल्याणपुरांच्या साय भरल्या आवाजात हे गाणं ऐकलं. आवाजातील भाव त्यांच्या सत्शील चेहेऱ्यावर कायम उमटतात. अनेक “एकमेव” गोष्टी जाग्या झाल्या. गदिमांचे संस्कृतला जवळ जाणारे पण मराठीपण अभिमानाने मिरवणारे शब्द ! बाबूजींची आर्त चाल – प्रतीक्षा करणाऱ्या आईची कथा निवेदन करणारी. सुमनताईंबद्दल काय बोलणार?

सध्या रोज सकाळी मी व माझी पत्नी त्यांची गाणी ऐकत असतो. दिवसाचा साज बदलतो त्याने.

असंच एकमेवपण दिसलं होतं – खन्नाच्या चेहेऱ्यावर ! लताचा “रैना बिती जाय ” स्वर चेहेऱ्यावर गोंदवून घेताना !

असंच एकमेवपण दिसलं होतं अशोक सराफच्या चेहेऱ्यावर ! फैयाज चं “हुरहुर असते तीच उरी ” हे “एक उनाड दिवस ” मधील सगळं गमावलेलं गीत भक्तिभावाने ऐकताना !

असंच एकमेवपण दिसलं होतं “कुंवारा बाप ” मधल्या हरलेल्या मेहमूदच्या नजरेत – ” आ री आजा , निंदिया तू ले चल कहीं “!

असंच एकमेवपण असतं अम्मांच्या समाधिशांत चेहेऱ्यावर – जेव्हा त्या डोळे मिटून घेतात, विश्वाचे आर्त स्वतःमध्ये साठवून घेताना!

या सगळ्यांना एकच विनंती – ” इथून दृष्ट काढितो,निमिष एक थांबा तुम्ही ! ”

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..