देशभरातील लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केंद्र शासनाने ४ मार्च २०२३ रोजी देशभरात लाईनमन दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आज महावितरणमध्ये सर्वत्र लाईनमन दिवस साजरा करण्यात येत आहे.
टाटा पॉवर आणि सीईए या अग्रगण्य संस्थांच्या पुढाकाराने ४ मार्च २०२१ पासून ‘लाईनमन दिवस’ साजरा करायला सुरुवात झाली आहे. ४ मार्च २०२२ ला दुसरा लाईनमन दिवस टाटा पॉवर कंपनी स्तरावर दिल्लीत साजरा झाला. तसेच ओडिशा, मुंबई, गोवा, अजमेर, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, झारखंड मध्येही हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
जनमित्र म्हणजेच लाईनमन हा महावितरणच्या व्यवस्थेमधील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. महावितरणचे जनमित्र ऊन, वारा, पाऊस तसेच इतरही अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठ्यासाठी ते चोवीस तास सेवा देतात. त्यांच्या या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. यात महावितरणच्या राज्यभरातील प्रादेशिक व परिमंडळ स्तरावर आयोजित मुख्य कार्यक्रमांमध्ये नियमित व बाह्यस्त्रोत महिला व पुरुष लाईनमनचा प्रादेशिक संचालक व मुख्य अभियंता यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय ग्रामीण भागात विभाग कार्यालयाचे कार्यक्षेत्र विस्तारलेले व दुर्गम आहे अशा विभागांतील उपविभाग कार्यालय किंवा अतिदुर्गम शाखा कार्यालयांमध्ये स्वतंत्रपणे लाईनमन दिवसाचे आयोजन करण्यात येणार आहे.
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
Leave a Reply