लिनस तोरवाल्ड्स यांचा जन्म २८ डिसेंबर १९६९ रोजी झाला.
फिनलंडच्या हेलसिंकी विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्स शिकणाऱ्या लिनस तोरवाल्ड्स यांनी १९९१ साली आपला नवीन संगणक चालविण्यासाठी एक ऑपरेटिंग सिस्टम विकसित केली. लिनस तोरवाल्ड्सने २१ व्या वर्षी विकसित केलेल्या ऑपरेटिंग सिस्टम आणि त्याची सर्व सांकेतिक रचना सर्वांसाठी विनामूल्य खुल्या केल्या. या पद्धतीला त्यांनी ओपन सोर्स नाव ठेवले. कारण त्या सॉफ्टवेअरचे सर्व सोर्स सर्वांसाठी खुले केले जाते. लिनस तोरवाल्ड्सच्या या कृत्याने सर्वांना ती सिस्टम वापरायला मिळणार होतीच, पण ती पुढे विकसित करू इच्छिणारे, त्यासंदर्भात सूचना करू शकणार होते. ते ऑपरेटिंग सिस्टम उत्तम करण्यासाठी त्यांनी जरी इतरांकडून सूचना मागविल्या होत्या, तरी आपण त्या अमलात आणूच असे नाही हे त्यांनी स्पष्ट केले होते.
आपल्या या ऑपरेटिंग सिस्टमला तोरवाल्ड्स यांनी फ्रीक्स असे नाव द्यायचे ठरविले होते. हा शब्द इंग्रजी शब्द फ्री (विनामूल्य), फ्रिक (विचित्र) आणि उनिक्स या दुसऱया ऑपरेटिंग सिस्टममधला एक्स हे अक्षर वापरून करण्यात आला होता. लिनस तोरवाल्ड्स यांच्या ऑपरेटिंग सिस्टमचा विकास करण्यासाठी अग्रगण्य असलेल्या हेलसिंकी तंत्रज्ञान विद्यापीठाचे अरी लेमके यांना फ्रीक्स हे नाव पसंत आले नाही आणि त्यांनी या ऑपरेटिंग सिस्टमचे नाव लिनक्स असे ठेवले. लिनस तोरवाल्ड्स यांना श्रेय मिळावे या हेतूने त्यांनी लिनस नावाबरोबर उनिक्सचा एक्स लावून लिनक्स हे नाव तयार केले आणि या नावाला तोरवाल्ड्स यांनी मान्यता पण दिली व २५ ऑगस्ट १९९१ रोजी लिनक्सची घोषणा केली.
— अभय मोकाशी.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply