नवीन लेखन...

लिस बेसाक – दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

लिस बेसाक चा  जन्म मॉरिशस मध्ये ११ मे १९०५ साली  झाला. तिचे कुटुंब लॅंडलॉर्ड होते.  ते १९१९ मध्ये पॅरिसला स्थलांतरित झाले.तिचे गुस्ताव वेलीमर याच्याशी प्रेम जुळले. यावर तिची आई नाराज होऊन तिने तिला इटलीला पाठवले. पुढे लिस पॅरिसला परतली.ती व तिचा भाऊ क्लाउड लपतछपत १९४१ मध्ये स्कॉटलंडला पोहोचले.तिला डेली स्केच दैनिकात नोकरी मिळाली व भाऊ  एसओई(गुप्तहेर संस्था) मध्ये भारती झाला. मॉरिशस लोकांचे इंग्रजी व फ्रेंचवर प्रभुत्व असल्याने त्यांना एसओई मध्ये भरती केले जाई. जसे एसओईने स्त्रियांची भारती सुरू केली लिसने आवेदन केले. तिला १९४२ साली  प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले.एसओई मध्ये स्त्रियांना कुरियर किंवा बिनतारी संदेश ऑपरेटर म्हणून पुरुषांच्या हाताखाली  भारती केली जाई.पण लिसने स्वताचे नेटवर्क तयार केले. १९४२ मध्ये तिला फर्स्ट एड नर्सिंग यॉमोऱ्नी संस्थेसाठी सेकंड लेफ्टनंट म्हणून नियुक्त केले.

पुढे ती भावासाठी कुरियर व संपर्क अधिकारी म्हणून काम करू लागली. पण असे भासवण्यात आले की ती विधवा आहे तिने चक्क जर्मन अधिकाऱ्याजवळ घर घेतले. तिच्या कामाचा जर्मनांना सुगावा लागला.तो धोका ओळखून ती व तिचा भाऊ १६ ऑगस्त १९४३ ला इंग्लंडला परतले.नवे हेर शोधण्यासाठी तिला रॉयल एयर फोर्स मध्ये पाठवण्यात आले.५ जून १९४४ ला तिला पुन्हा फ्रांसला पाठवण्यात आले. जेव्हा तिला समजले की फ्रांस स्वतंत्र होण्याची शक्यता आहे तेव्हा ती जर्मनांना चकवा देत ३०० किलो मिटरचा प्रवास सायकलने  करत  नॉरमांडी येथे पोचली.तिचे काम झाल्यावर ती पुन्हा इंग्लंडला परतली. दुसरे महायुद्ध संपल्यावर ती बीबीसी मध्ये काम करू लागली. तिने गुस्ताव वेलीमरसही लग्न केले.ते मारसेलीस येथे राहू लागले तिच्या नवऱ्याचा १९७८ मध्ये मृत्यू झाला. व  ९ मार्च २००४ रोजी तिचा मृत्यू झाला .

–रवींद्र शरद वाळिंबे

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 85 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..